जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / एअर फोर्समधील पायलटला नक्की किती मिळतो पगार? कशी असते सिलेक्शन प्रोसेस? इथे मिळेल A-Z माहिती

एअर फोर्समधील पायलटला नक्की किती मिळतो पगार? कशी असते सिलेक्शन प्रोसेस? इथे मिळेल A-Z माहिती

एअर फोर्समधील पायलटला नक्की किती मिळतो पगार? कशी असते सिलेक्शन प्रोसेस? इथे मिळेल A-Z माहिती

पायलटची भरती फ्लाईंग ब्रँचद्वारे केली जाते. हवाई दलातील पायलटचे फायटर पायलट, ट्रान्सपोर्ट पायलट आणि हेलिकॉप्टर पायलट, असे तीन प्रकार पडतात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 एप्रिल :  भारतीय हवाई दलात पायलट होण्याचं हजारो तरुणांचं स्वप्न आहे. चांगला पगार आणि इतर सुविधांच्या बाबतीत भारतीय हवाई दल हे विमान वाहतूक क्षेत्रातील आकर्षक नियोक्त्यांपैकी एक आहे. भारतीय हवाई दलात फ्लाईंग ब्रँच, ग्राउंड ड्युटी टेक्निकल ब्रँच आणि ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल ब्रँच या तीन शाखांमध्ये कर्मचारी भरती केली जाते. पायलटची भरती फ्लाईंग ब्रँचद्वारे केली जाते. हवाई दलातील पायलटचे फायटर पायलट, ट्रान्सपोर्ट पायलट आणि हेलिकॉप्टर पायलट, असे तीन प्रकार पडतात. भारतीय हवाई दलात पायलट होण्याचे चार मार्ग इयत्ता बारावीनंतर भारतीय हवाई दलात पायलट होता येतं. यासाठी चार मार्ग आहेत – यूपीएससी एनडीए परीक्षा, कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षा म्हणजेच सीडीएस, एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (एएफसीएटी) आणि एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम. 1-2 नाही तर देशातील ‘या’ विद्यापीठात तब्बल 700 जागांसाठी भरतीची घोषणा; तुम्ही आहात का पात्र? करा अप्लाय 1. यूपीएससी एनडीए परीक्षा: 12वी नंतर यूपीएससी एनडीए परीक्षेद्वारे भारतीय हवाई दल, लष्कर आणि नौदलात भरती होता येतं. एनडीएची परीक्षा देण्यासाठी उमेदवाराचं वय 16½ ते 19½ वर्षांदरम्यान असलं पाहिजे. या शिवाय, तो फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांसह बारावी उत्तीर्ण असला पाहिजे. एनडीएच्या माध्यमातून हवाई दलाच्या फ्लाईंग ब्रँच, ग्राउंड ड्युटी टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल ब्रँचमध्ये प्रवेश करता येतो. 2. कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षा (सीडीएस): सीडीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय हवाई दलात कायमस्वरूपी कमिशन मिळू शकतं. ही परीक्षा देण्यासाठी 20 ते 24 वर्षांच्या दरम्यान वय असलं पाहिजे. उमेदवाराकडे बीए/बीएस्सी/बीकॉम उत्तीर्ण असल्याची शैक्षणिक पात्रता पाहिजे. इयत्ता बारावीमध्ये उमेदवाराला फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स हे दोन विषय असणं बंधनकारक आहे किंवा बीई किंवा बी.टेक केलेलं असलं पाहिजे. ज्यांचं फक्त नाव घेतलं तरी गुन्हेगारांच्या अंगाचा उडतो थरकाप; कोण आहेत या ‘मर्दानी लेडी सुपरकॉप’? 3. एअरफोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (एएफसीएटी): भारतीय हवाई दलाच्या फ्लाईंग ब्रँचमध्ये भरती होण्यासाठी कोणीही एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (एएफसीएटी) परीक्षेला बसू शकतं. एएफसीएटी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय हवाई दलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन उपलब्ध आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशन सुरुवातीला 14 वर्षांसाठी असतं. नंतर त्यामध्ये वाढ करता येते. एएफसीएटी देण्यासाठी 20 ते 24 वर्षांदरम्यान वय असलं पाहिजे. उमेदवाराकडे डीजीसीएनं जारी केलेला व्यावसायिक पायलट परवाना असल्यास परीक्षा देण्याची कमाल वयोमर्यादा 26 वर्षे आहे. इच्छुक उमेदवारानं मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स या विषयांसह इयत्ता बारावीत किमान 50 टक्के गुण मिळवलेले असावेत. यासह, किमान 60 टक्के गुणांसह बीए/बीएस्सी/बीकॉम किंवा बीई/बीटेक उत्तीर्ण झालेलं पाहिजे. ही सुवर्णसंधी सोडणं परवडणारच नाही; 80,000 पगार आणि थेट सुप्रीम कोर्टात नोकरी; खुद्द न्यायाधीश घेणार मुलाखत 4. एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम: अविवाहित मुलं आणि मुली दोघंही एनसीसी स्पेशल एंट्री स्कीमद्वारे हवाई दलात सामील होऊ शकतात. यासाठी एनसीसी एअरविंग सीनिअर डिव्हिजन सी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. एनसीसी स्पेशल एंट्री स्कीममधून भरती होताना कायमस्वरूपी कमिशन उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवाराचं वय 20 ते 24 वर्षांदरम्यान असलं पाहिजे. जर, उमेदवाराकडे व्यावसायिक पायलट परवाना असेल तर कमाल वयोमर्यादा 26 वर्षे आहे. इच्छुक उमेदवारानं मॅथेमॅटिक्स, फिजिक्स आणि केमेस्ट्री या विषयांसह इयत्ता बारावीत किमान 50 टक्के गुण मिळवलेले पाहिजेत. यासह, किमान 60 टक्के गुणांसह बीए/बीएस्सी/बीकॉम किंवा बीई/बीटेक उत्तीर्ण झालेलं असावं.'

News18लोकमत
News18लोकमत

भारतीय वायुसेनेतील पायलटचं वेतन भारतीय वायुसेनेच्या एएफसीएटी वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, वायुसेना अधिकाऱ्याचा सुरुवातीचा पगार 56 हजार 100 रुपये प्रतिमहिना आहे. फ्लाईंग ऑफिसरला 56 हजार 100 ते 1 लाख 10 हजार 700 रुपयांपर्यंत पगार मिळतो. फ्लाईंग ऑफिसरला दरमहा 15 हजार 500 रुपये लष्करी सेवा वेतनासह उड्डाण भत्ता, तांत्रिक शाखेच्या अधिकाऱ्यांना तांत्रिक भत्ता व्यतिरिक्त मिळतो. वाहतूक, मुलांचं शिक्षण, एचआरए इत्यादी भत्ते मिळतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात