मुंबई, 19 एप्रिल : भारतामध्ये अनेक चांगल्या दर्जाच्या शिक्षण संस्था आणि विद्यापीठे आहेत. अशाच विद्यापीठांमध्ये विश्व-भारती विद्यापीठाचा समावेश होतो. विश्व-भारती हे सार्वजनिक केंद्रीय विद्यापीठ आहे. पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन येथे असलेल्या या विद्यापीठाची गणना देशातील महत्त्वाच्या राष्ट्रीय संस्थांमध्ये होते. याची स्थापना रवींद्रनाथ टागोर यांनी केली होती. अशा या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या विद्यापीठामध्ये नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विश्व भारतीनं एमटीएस, एसओ, डीईओ आणि इतर पदांसाठी उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार vbharatirec.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर विविध पदांच्या पात्रता आणि इतर तपशील तपासून अर्ज करू शकतात. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. विश्व-भारतीमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे आहे. या भरती मोहिमेद्वारे, एमटीएस, लोअर डिव्हिजन क्लार्क, लायब्ररी अटेंडंट, लॅबोरेटरी अटेंडंट, सेक्शन ऑफिसर. ज्युनिअर इंजिनीअर, स्टेनोग्राफर आणि इतर पदांची भरती केली जाणार आहे. ज्यांचं फक्त नाव घेतलं तरी गुन्हेगारांच्या अंगाचा उडतो थरकाप; कोण आहेत या ‘मर्दानी लेडी सुपरकॉप’? निवड प्रक्रिया विश्व भारतीतील कर्मचारी निवड प्रक्रियेत प्रामुख्याने चार टप्प्यांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांना लेखी चाचणी, कौशल्य चाचणी (आवश्यक असल्यास), डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन या चार प्रक्रियांमधून जावं लागेल. रिक्त पदाचं नाव आणि संख्या: लोअर डिव्हिजन क्लार्क/ ज्युनिअर ऑफिसर असिस्टंट कम टायपिस्ट - 99 मल्टि टास्किंग स्टाफ (एमटीएफ) - 405 अप्पर डिव्हिजन क्लार्क / ऑफिस असिस्टंट - 29 सेक्शन ऑफिसर - 04 असिस्टंट/ सीनिअर असिस्टंट - 05 प्रोफेशनल असिस्टंट - 06 सेमी प्रोफेशनल असिस्टंट - 05 लायब्ररी असिस्टंट - 06 लायब्ररी अटेंडंट - 05 लॅबोरेटरी असिस्टंट - 01 लॅबोरेटरी अटेंडंट - 45 असिस्टंट इंजिनीअर इलेक्ट्रिकल - 01 असिस्टंट इंजिनीअर सिव्हिल - 01 ज्युनिअर इंजिनीअर सिव्हिल - 09 ज्युनिअर इंजिनीअर इलेक्ट्रिकल - 01 प्रायव्हेट सेक्रेटरी - 07 पर्सनल सेक्रेटरी - 08 स्टेनोग्राफर - 02 सीनिअर टेक्निकल असिस्टंट - 02 टेक्निकल असिस्टंट - 17 सिक्युरिटी इन्स्पेक्टर - 01 सीनिअर सिस्टिम अॅनॅलिस्ट - 01 सिस्टिम प्रोग्रॅमर - 03 रजिस्ट्रार (टेन्युअर पोस्ट) - 01 फायनान्स ऑफिसर (टेन्युअर पोस्ट) - 01 लायब्ररियन - 01 डेप्युटी रजिस्ट्रार - 01 इंटरर्नल ऑडिट ऑफिसर (डेप्युटेनशन) - 01 असिस्टिंट लायब्ररियन - 06 असिस्टिंट रजिस्ट्रार - 02 ही सुवर्णसंधी सोडणं परवडणारच नाही; 80,000 पगार आणि थेट सुप्रीम कोर्टात नोकरी; खुद्द न्यायाधीश घेणार मुलाखत विश्व भारतीमध्ये अशा एकूण 709 रिक्त पदांसाठी कर्मचारी भरती केली जाणार आहे. अर्ज कसा करावा? 1. vbharatirec.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 2. होम पेजवर, ‘विश्व-भारती भरती परीक्षा - 2023 ऑनलाइन नोंदणी’ असं लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा. 3. ओपन झालेल्या नवीन पेजवर रजिस्ट्रेशन करा आणि अॅप्लिकेशन फॉर्म भरा. 4. आवश्यक कागदपत्रं अपलोड करा आणि लागू असल्यास अॅप्लिकेशन फी भरा. 5. भविष्यातील संदर्भासाठी अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंटआउट काढून ठेवा.
अॅप्लिकेशन फी पोस्टनुसार अर्जाची फी वेगवेगळी आहे. ग्रुप ‘ए’ मधील (अॅकॅडमिक लेव्हल/लेव्हल 14) पोस्टसाठी अर्ज करताना जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरीतील इच्छुकांना 2000 रुपये आणि एससी/एसटी कॅटेगरीतील इच्छुकांना 500 रुपये अर्ज फी भरावी लागेल. ग्रुप ‘सी’ मधील पोस्टसाठी अर्ज करताना जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरीतील इच्छुकांना 900 आणि एससी/एसटी कॅटेगरीतील इच्छुकांना 225 रुपये अर्ज फी भरावी लागेल.