Central Railway Recruitment 2021: ITI पास असणाऱ्यांसाठी खूशखबर, मध्य रेल्वेत नोकरीची संधी

Central Railway Recruitment 2021: ITI पास असणाऱ्यांसाठी खूशखबर, मध्य रेल्वेत नोकरीची संधी

Central Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेने 2532 अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्रातील विविध गटांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची नेमणूक केली जाईल. ही निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी: मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील विविध क्लस्टरमध्ये अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छूक उमेदवार मध्य रेल्वेची अधिकृत वेबसाइट rrccr.com च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करु शकतात. मध्य रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्रातील विविध क्लस्टरमध्ये अप्रेंटिसच्या एकूण 2532 पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

ही गोष्ट लक्षात ठेवा -

यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मध्य रेल्वेने जारी केलेली अधिसूचना व्यवस्थित वाचावली आणि त्यानंतरच अर्ज करावा. नियमांनुसार केलेला अर्जच वैध असणार आहे. अर्जामध्ये कमतरता आढळल्यास तो रद्द केला जाईल.

शैक्षणिक पात्रता -

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दहावीला 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे. त्याचसोबत उमेदवाराकडे आयटीआय डिप्लोमा सर्टिफिकेट पाहिजे.

वयाची मर्यादा -

- 31 जानेवारी 2021नुसार उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.

- एसटी आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

- ओबीसी उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

- दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादेमध्ये 10 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

या क्लस्टरसाठी केली जाणार भरती -

मध्य रेल्वे महाराष्ट्रातील मुंबई क्लस्टर, भुसावळ क्लस्टर, नागपूर क्लस्टर, कल्याण क्लस्टर आणि सोलापूर क्लस्टरसाठी भरती करणार आहे.

हे देखील वाचा -  मोठी बातमी! सलग 5 तासांहून अधिक वेळ काम करता? 1 एप्रिलपासून मोदी सरकार नियमांमध्ये करणार बदल

या आहेत महत्वाच्या तारखा -

अर्ज करण्याची प्रारंभ तारीख - 6 फेब्रुवारी 2021

अर्ज करण्याची अंतिम तारीख - 5 मार्च 2021

अर्ज प्रक्रिया - ऑनलाईन

अर्ज फी - 100 रुपये

Published by: Aditya Thube
First published: February 9, 2021, 8:33 AM IST

ताज्या बातम्या