मुंबई, 20 मार्च: यांत्रिक पद्धतीनं तयार करण्यात आलेलं सूत व कापडाच्याबाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. सुती कापड उद्योग हा भारतातील सर्वांत मोठा संघटित असा उद्योग आहे. त्यामुळे या उद्योगाशी संबंधित बाबींसाठी केंद्र सरकारने स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली आहे. वस्त्रोद्योग मंत्रालय ही एक भारतीय सरकारी राष्ट्रीय संस्था आहे जी भारतातील वस्त्रोद्योगाचं धोरण, नियोजन, विकास, निर्यात आणि त्या संबंधीच्या नियमनासाठी जबाबदार आहे. या सर्व कामासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असते. आताही वस्त्रोद्योग मंत्रालयातील पीएसयू विभागासाठी यंग प्रोफेशनल्स पदांसाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या 2023 भरतीच्या अधिसूचनेनुसार, वरील पदासाठी दोन जागा रिक्त आहेत. या पदावर काम करण्यास इच्छुक असलेली व्यक्ती 35 वर्षांपेक्षा कमी वयाची असणं गरजेचं आहे. या शिवाय, इच्छुक उमेदवाराला सरकारी क्षेत्रातील कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणं अपेक्षित आहे. 'स्टडी कॅफे'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
यंग प्रोफेशनल्स पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 70 हजार रुपये मासिक वेतन मिळेल. उमेदवारांची नियुक्ती एका वर्षासाठी केली जाईल, जी दोन वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते. इच्छूक उमेदवार अर्जासह आवश्यक कागपत्रांच्या स्कॅन केलेल्या सेल्फ अटेस्टेड प्रती मेलच्या माध्यमातून अधिसूचनेत दिलेल्या लिंकवर पाठवू शकतात. हा अर्ज ही सूचना प्रकाशित झाल्यापासून 15व्या दिवशी सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत सादर करणं आवश्यक आहे.
कोणतीच परीक्षा नाही थेट HPCL मध्ये भरती; संधी सोडू नका; उद्याची शेवटची तारीख; करा अर्ज
पोस्टचं नाव: यंग प्रोफेशनल्स पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांची एका वर्षासाठी नियुक्ती केली जाईल. जी नंतर दोन वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या 2023 भरतीच्या अधिसूचनेनुसार, यंग प्रोफेशनल्स पदांसाठी दोन जागा रिक्त आहेत. याशिवाय पीएसयू विभागात आणखी चारा जागा रिक्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वयोमर्यादा: यंग प्रोफेशनल्स पदावर काम करण्यास इच्छुक असलेली व्यक्ती 35 वर्षांपेक्षा कमी वयाची असणं गरजेचं आहे.
Resume अवघ्या काही मिनिटांमध्ये अपडेट करायचाय? मग वापरा 'PFK' पद्धत; पण हे नक्की आहे तरी काय?
वेतन: यंग प्रोफेशनल्स पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 70 हजार रुपये मासिक वेतन मिळेल.
A) अत्यावश्यक पात्रता:
i) मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीतून लॉ ग्रॅज्युएट किंवा एमबीए पूर्ण झालेलं पाहिजे.
ii) कंपनी लॉ/कॉर्पोरेट लॉ/कॉर्पोरेट अॅडमिनिस्ट्रेशनचा अनुभव असणं गरजेचं आहे.
NTPC Recruitment: 10वी पास उमेदवारांसाठी जॉबची मोठी सुवर्णसंधी; इतका मिळेल पगार; करा अप्लाय
B) औपचारिक पात्रता:
i) मास्टर इन लॉ (एल.एल.एम)
ii) कॉम्प्युटर नॉलेज (एमएस वर्ड, अॅक्सेस, एक्सेल, पॉवरपॉइंट इ.) आवश्यक
निवड प्रक्रिया: निवडलेल्या उमेदवारांना बोर्डाद्वारे मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. त्यातून निवडलेल्या दोन सर्वोत्तम व्यक्तींची नियुक्ती केली जाईल.
अर्ज कसा करावा?
इच्छूक उमेदवार अर्जासह आवश्यक कागपत्रांच्या स्कॅन केलेल्या सेल्फ अटेस्टेड प्रती मेलच्या माध्यमातून अधिसूचनेत दिलेल्या लिंकवर पाठवू शकतात. हा अर्ज ही सूचना प्रकाशित झाल्यापासून 15व्या दिवशी सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत सादर करणं आवश्यक आहे. पाठवलेल्या मेलचा सब्जेक्ट पुढीलप्रमाणे असणं अपेक्षित आहे: "एमओटी येथे यंग प्रोफेशनल [वायपी) साठी अर्ज: [या ठिकाणी तुमचं स्वत:चं नाव लिहा]"
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Central government, Job Alert, Jobs Exams