मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Resume अवघ्या काही मिनिटांमध्ये अपडेट करायचाय? मग वापरा 'PFK' पद्धत; पण हे नक्की आहे तरी काय?

Resume अवघ्या काही मिनिटांमध्ये अपडेट करायचाय? मग वापरा 'PFK' पद्धत; पण हे नक्की आहे तरी काय?

'PFK' पद्धत नक्की आहे तरी काय?

'PFK' पद्धत नक्की आहे तरी काय?

आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमचा Resume अवघ्या तीन स्टेप्समध्ये चेंज करू शकाल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 मार्च: कोणताही जॉब मिळवण्यासाठी सुरुवातीला त्या कंपनी तुम्हाला Resume देणं आवश्यक असतं. जर त्या कंपनीतील वरिष्ठांना तुमचा Resume आवडला तरच तुम्हाला पुढील प्रोसेससाठी संधी दिली जाते. पण जर तुमच्या Resume मध्ये चुका असतील तर तुम्हाला कधीच बोलावण्यात येणार नाही. एका सामान्य कागदासारखी त्या Resume ची किंमत होईल. पण तुम्हाला जर तुमचा Resume असामान्य बनवायचा आहे तर तुम्हाला तो जॉब पोस्ट आणि कंपनीनुसार सतत अपडेट करत राहणं आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमचा Resume अवघ्या तीन स्टेप्समध्ये चेंज करू शकाल. चला तर मग जाणून घेऊया.

NTPC Recruitment: 10वी पास उमेदवारांसाठी जॉबची मोठी सुवर्णसंधी; इतका मिळेल पगार; करा अप्लाय

कंपनी आणि पोस्टबद्दल विचार करा

सर्वात महत्त्वाचं P म्हणजे पोस्ट. तुमच्या रेझ्युमेमधून कोणती माहिती समाविष्ट करायची किंवा वगळायची हे ठरवण्यापूर्वी, तुम्हाला स्वारस्य असलेली पोस्ट आणि कंपन्या काय शोधत आहेत ते तपासा. हे तुम्हाला तुमच्या रेझ्युमेच्या भरवश्यावर जॉब देण्यास मदत करू शकते. तुम्ही तुमचा अनुभव नोकरीच्या जाहिरातीनुसार तयार करू शकता, तुमचे स्किल्स हायलाइट करू शकता आणि ऑनलाइन अपस्किलिंग कोर्सची सर्टिफिकेशन्स त्या पोस्टप्रमाणे त्यामध्ये जोडू शकता.

देशासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या RAW Agents ना किती मिळतो पगार? मिळतात 'या' सवलती

पोस्टनुसार बनवा Format

F म्हणजे फॉरमॅट. तुम्ही तांत्रिक भूमिकेसाठी अर्ज करत असल्यास, प्रथम प्रोग्रामिंग लँग्वेजबद्दल लिहा. तुमच्या प्रोजेक्टनुसार भाषा लिहा, त्यानंतर तुम्ही किती प्रोजेक्ट्सवर काम केले आहे ते लिहा. तुम्ही कोणत्याही मोबाईल अॅपसाठी काम केले असेल तर त्या अनुभवाबद्दल नक्की लिहा

ATS नुसार तुमचा CV अपडेट करा

K म्हणजे कि वर्ड्स. अनेक कंपन्या अप्लिकन्ट ट्रॅकिंग सिस्टीम (ATS) वापरतात त्यांना मिळालेल्या असंख्य रेझ्युमेमधून क्रमवारी लावण्यासाठी. एटीएस हा सॉफ्टवेअरचा एक भाग आहे जो तुमचा रेझ्युमे पार्स करतो, तुमच्या Resume मधील काही Keywords शोधतो आणि त्यानुसार तुमच्या Resume ची रेटिंग होते. म्हणूनच तुमच्या Resume मध्ये काही गोल्डन keywords लिहा जे कंपनीच्या पोस्टनुसार असतील. ज्यामुळे तुमचा Resume प्रभावी होईल.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job Alert, Jobs Exams