Home /News /career /

CBSE 12th Result: विद्यार्थ्यांनो, कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो निकाल; सतत Websites करा चेक

CBSE 12th Result: विद्यार्थ्यांनो, कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो निकाल; सतत Websites करा चेक

कोणत्याही क्षणी हे निकाल समोर येतील

कोणत्याही क्षणी हे निकाल समोर येतील

आता CBSE बोर्डाकडून बारावीच्या टर्म 1 परीक्षांचे निकालही (CBSE 12th class term 1 Result) जाहीर करण्यात येतील अशी माहिती समोर येतेय.

    मुंबई,12 मार्च: कोरोनामुळे चालू शैक्षणिक वर्षातील बोर्डाच्या परीक्षा या दोन सत्रांमध्ये होतील अशी घोषणा CBSE तर्फे करण्यात आली होती. त्यातल्या पहिल्या सत्राचा (CBSE class 10th term 1 results out) हा निकाल आहे. काही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे 100 टक्के गुण मिळाले आहेत. आणि एकही विद्यार्थी नापास झालेला नाही.CBSE (Central Board of Secondary Education) बोर्डाच्या शाळांकडे निकाल सोपवण्यात आले आहेत. निकाल आल्याचं जाहीर झालेलं असलं तरी विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप मार्कशीट (CBSE Term 1 result marksheet) पडलेली नाही. फक्त किती गुण मिळाले तो आकडा जाहीर झालेला आहे. त्यानुसार आता CBSE बोर्डाकडून बारावीच्या टर्म 1 परीक्षांचे निकालही (CBSE 12th class term 1 Result) जाहीर करण्यात येतील अशी माहिती समोर येतेय. कोणत्याही क्षणी हे निकाल समोर येतील अशी माहिती आहे. CBSE Results: विद्यार्थ्यांनो, निकाल बघताना मार्कांसह 'या' IMP गोष्टीही करा चेक CBSE बोर्डाकडून बारावीच्या टर्म 1 परीक्षांचा निकाल कोणत्याही क्षणी जाहीर (CBSE 12th class term 1 Result) होऊ शकतो म्हणूनच विद्यार्थ्यांनी सतत बोर्डाची वेबसाईट सतत चेक करत राहणं आवश्यक आहे. CBSE बोर्डाच्या काही अधिकार्‍यांनी, विविध माध्यमांना दिलेल्या निवेदनात, CBSE टर्म 1 चा निकाल लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत, आज म्हणजेच 11 मार्च 2022 रोजी CBSE 12वी टर्म 1 चा निकाल (CBSE 12th class term 1 Result date) जाहीर केला जाऊ शकतो असं सांगण्यात येत आहे. CBSE बोर्ड टर्म 1 ची परीक्षा डिसेंबर 2021 मध्ये झाली. तेव्हापासून निकाल जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. CBSE बोर्डाचा निकाल अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर प्रसिद्ध केला जाईल. आज बोर्डानं दहावीचा निकाल जाहीर केला मात्र आता विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षांच्या निकालाची प्रतीक्षा आहे. बोर्ड हा निकाल ऑफिशिअल वेबसाईटवर जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे. CBSE 10th Exam Results: दहावीचा निकाल जाहीर, कधी आणि कशी मिळेल मार्कशीट? अशा पद्धतीनं चेक करा निकाल सर्वप्रथम (How to check CBSE 12th class term 1 Result) CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जा. होम पेज वर दिसणार्‍या 'CBSE 10th, 12th Results' या लिंकवर क्लिक करा. लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि Submit वर क्लिक करा. तुमचा CBSE टर्म 1 चा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल. निकाल तपासा आणि डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी ठेवा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Board Exam, Career, CBSE, Exam result, HSC

    पुढील बातम्या