Home /News /career /

CBSE Term 1 Result: विद्यार्थ्यांनो, निकाल बघताना मार्कांसह 'या' IMP गोष्टीही करा चेक; अन्यथा....

CBSE Term 1 Result: विद्यार्थ्यांनो, निकाल बघताना मार्कांसह 'या' IMP गोष्टीही करा चेक; अन्यथा....

महत्त्वाच्या गोष्टी चेक करणं आवश्यक

महत्त्वाच्या गोष्टी चेक करणं आवश्यक

विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल शाळांच्या माध्यमातून बघता येणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी त्यांच्या निकालात काही महत्त्वाच्या गोष्टी चेक करणं आवश्यक आहे. जाणून घेऊया.

    मुंबई,12 मार्च: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता मागील वर्षीच्या CBSE बोर्डाच्या परीक्षा (CBSE Board 10th class Exams) रद्द करण्यात आल्या. मात्र यंदा परीक्षा रद्द कराव्या लागू नयेत म्हणूनच CBSE बोर्डाकडून दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा दोन टर्ममध्ये (CBSE Board terms exams) घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार CBSE च्या पहिल्या टर्मच्या परीक्षा (CBSE Board Term 1 Exams) घेण्यात आल्या होत्या या परीक्षेला तब्बल तीन महिने उलटून गेले तरी अजून निकाल (CBSE Board Term 1 Result) जाहीर करण्यात आला नव्हता. मात्र आता CBSE बोर्डानं दहाव्या वर्गाच्या टर्म 1 परीक्षांचे निकाल (CBSE Board Term 1 Result declared) जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल शाळांच्या माध्यमातून बघता येणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी त्यांच्या निकालात काही महत्त्वाच्या गोष्टी चेक करणं आवश्यक आहे. जाणून घेऊया. या गोष्टी जाणून घेणं आवश्यक CBSE Term 1 चा निकाल हा विद्यार्थ्यांच्या संपूर्ण बोर्डाच्या निकालातील महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निकालात आणि मार्कशीटवर काही महत्त्वाच्या गोष्टी (Important things to check on CBSE Board Result by students) चेक करून घेणंही आवश्यक आहे. CBSE 10th Exam Results: दहावीचा निकाल जाहीर, कधी आणि कशी मिळेल मार्कशीट? संपूर्ण मार्क्स निकाल बघताना विद्यार्थ्यांनी संपूर्ण विषयांचे मार्क्स आणि त्या मार्कांची एकूण बेरीज तंतोतंत जुळते का हे चेक करून घेणं आवश्यक आहे. तसंच एकूण मार्क्स आणि प्राप्त मार्क्स बघून एकूण पर्सेंटेज किंवा पॉइंटर बरोबर आहे का हे बघणं आवश्यक आहे. इतर माहिती चेक करणं आवश्यक हा निकाल तुमच्या अंतीम निकालात दिसणार आहे म्हणून निकाल बघताना विद्यार्थ्यांनी त्यांचं नाव, शाळेचं नाव, परीक्षेचं नाव तापसून घेणं आवश्यक आहे. तसंच विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांचं म्हणजेच आई आणि वडिलांचं नावही चेक करणं आवश्यक आहे. या सर्व नावांमध्ये काही स्पेलिंगच्या चुका तर नाहीत ना हे चेक करणंही आवश्यक आहे. बारावीची Term 2 परीक्षा कधी? CBSE बोर्डाने जाहीर केली Data sheet चुका असल्यास काय करावं? जर विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालात काही चुका आढळल्यास विद्यार्थ्यांनी त्वरित शाळेतील संबंधित अधिकाऱ्यांकडे यासंबंधीची माहिती देणं आवश्यक आहे. तसंच शाळांनाही भाषा विद्यार्थ्यांची एक दुरस्ती असलेली लिस्ट बोर्डाकडे पाठवणं आवश्यक आहे. महत्त्वाचं म्हणजे अशावेळी घाबरून न जात विद्यार्थ्यांनी त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे.
    First published:

    Tags: CBSE, Education, Exam result, Ssc board

    पुढील बातम्या