Home /News /career /

CBSE 10th Exam Results: दहावीचा निकाल जाहीर, कधी आणि कशी मिळेल मार्कशीट?

CBSE 10th Exam Results: दहावीचा निकाल जाहीर, कधी आणि कशी मिळेल मार्कशीट?

असा बघा निकाल

असा बघा निकाल

CBSE 10th board results: बोर्डाने दहावीच्या Term 1 चे निकाल जाहीर केले आहेत. CBSE बोर्डाच्या शाळांकडे निकाल सोपवण्यात आले आहेत. कधी आणि कसे पाहायचे निकाल?

    दिल्ली, 12 मार्च: CBSE बोर्डाने दहावीच्या Term 1 चे निकाल जाहीर केले आहेत. CBSE (Central Board of Secondary Education) बोर्डाच्या शाळांकडे निकाल सोपवण्यात आले आहेत. निकाल आल्याचं जाहीर झालेलं असलं तरी विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप मार्कशीट पडलेली नाही. फक्त किती गुण मिळाले तो आकडा जाहीर झालेला आहे. CBSE ने या वेळी दहावीची परीक्षा दोन सत्रांत घ्यायचा निर्णय घेतला होता. त्यातल्या पहिल्या सत्राचा (CBSE class 10th term 1 results out) हा निकाल आहे. काही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे 100 टक्के गुण मिळाले आहेत. आणि एकदी विद्यार्थी नापास झालेला नाही. गुणपत्रिका कधी मिळणार? CBSE class 10th When Will Marks be CBSE बोर्डाने निकाल शाळांकडे सोपवले असल्याची माहिती दिली आहे. आता शाळा आपापल्या पातळीवर गुणपडताळणी करून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटप करतील किंव ऑनलाइन जाहीर करतील. देशभऱातल्या काही शाळांनी गुणपत्रिका द्यायला सुरुवातही केली आहे. CBSE term 1 चे दहावीचे निकाल शाळांकडे सुपूर्द केले आहेत. शाळांकडे यापूर्वीच प्रॅक्टिकल आणि इंटर्नल असेसमेंटचे निकाल आलेले आहेत. आज थिअरी पेपर्सचे गुण कळवण्यात आले. आता शाळा हा निकाल एकत्र करून गुणपत्रिका विद्यार्थ्यांना देतील. याविषयी अधिक माहिती बोर्डाच्या वेबसाइटवर आहे. CBSE Term 1 Result: विद्यार्थ्यांनो, निकाल बघताना मार्कांसह 'या' IMP गोष्टीही करा चेक; अन्यथा.... 100 टक्के निकाल 100% गुण CBSE class X term 1 Exam मध्ये एकही विद्यार्थी नापास झालेला नाही. याचा अर्थ पहिल्या सत्राचा निकाल 100 टक्के लागला आहे. आता या वर्षीचा निकाल दुसऱ्या सत्राची परीक्षा झाल्यानंतरच किती तो कळेल. गेल्या वर्षी Covid-19 च्या साथीमुळे परीक्षा ऑफलाइन स्वरूपात झालेली नव्हती आणि internal Assessment  आणि गेल्या वर्षीपर्यंतची विद्यार्थ्यांची कामगिरी यावरूनच दहावीचे गुण देण्यात आले होते. त्यानुसार गेल्या वर्षी  CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल 99.57 per cent लागला होता. या वर्षी दोन सत्रांत परीक्षा घ्यायचा निर्णय झाला होता. दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिल-मेमध्ये होणार आहे. म्हणजे यंदापासून CBSE च्या विद्यार्थ्यांना दोन वेळा बोर्डाची परीक्षा द्यावी लागेल.
    First published:

    Tags: 10th class, Board Exam, CBSE, Exam result

    पुढील बातम्या