Home /News /career /

Career After 12th: विद्यार्थ्यांनो, कॉमर्स म्हणजे फक्त CA नाही; 'हे' भन्नाट कोर्सेस देतील मोठ्या पगाराचे जॉब्स

Career After 12th: विद्यार्थ्यांनो, कॉमर्स म्हणजे फक्त CA नाही; 'हे' भन्नाट कोर्सेस देतील मोठ्या पगाराचे जॉब्स

बारावीनंतर कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन

बारावीनंतर कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन

जर तुम्हाला बारावीनंतर कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन करायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला काही कोर्सेस सांगणार आहोत.

  मुंबई, 11 जून: महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल (Maharashtra state Board 12th Result 2022) नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये पदवीला प्रवेश (Graduation Admission after 12th) घेण्याची लगबग सुरु आहे. मात्र अजूनही अनेकांना अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळाले नाहीत किंवा अपेक्षेपेक्षा अधिक मार्क्स मिळाले आहेत त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. ग्रॅज्युएशनसाठी नक्की कोणतं फिल्ड निवडावं. कोणत्या फिल्डमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यास अधिक पगाराची नोकरी लागू शकते? (High salary job course after 12th) हे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत. त्यात यंदा ऑफलाईन परीक्षा होऊनही निकाल उत्तम लागला आहे. त्यामुळे स्पर्धाही खूप असणार आहे. पण चिंता करू नका. जर तुम्हाला बारावीनंतर कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन करायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला काही कोर्सेस सांगणार आहोत. दहावीनंतर सायन्स स्ट्रीम (12th Science) घेणाऱ्या विद्यार्थ्यांनंतर कॉमर्स क्षेत्राचा (Commerce in 12th) नंबर लागतो. कॉमर्समध्येही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रवेश (Commerce admissions) घेतात. यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना कमी गुणांमुळे सायन्समध्ये प्रवेश मिळू शकत नाही म्हणून ते कॉमर्समध्ये आले असतात. बारावीनंतर कॉमर्समध्ये CA (CA admissions) होण्याव्यतिरिक्त काहीच करिअर (Career in Commerce) नाही असं अनेकांना वाटत असतं. मात्र अजिबात नाही. बारावीनंतर कॉमर्समध्ये असे अनेक ग्रॅज्युएशन कोर्सेस (graduation courses in commerce) आहेत ज्यामध्ये तुम्हाला करिअर करता येऊ शकेल. चला तर मग जाणून घेऊया अशा काही कोर्सेसबदल. बारावीनंतर ग्रॅज्युएशन कोर्सला प्रवेश घेताय? जरा थांबा; आधी 'या' IMP गोष्टी वाचा
  कॉमर्समधील काही ग्रॅज्युएशन कोर्सेस
  बी.कॉम- बॅचलर ऑफ कॉमर्स (B.Com) बीबीए- बॅचलर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (BBA) बीकॉम (ऑनर्स) (B.Com) (Hons.) अर्थशास्त्रात बीए (ऑनर्स) (BA (Hons.) in Economics) इंटिग्रेटेड लॉ प्रोग्राम- बी.कॉम एल.एल.बी. (B.Com LL.B.) इंटिग्रेटेड लॉ प्रोग्राम - बीबीए एलएल.बी (BBA LL.B) याशिवाय कॉमर्समध्ये बारावी झाल्यानंतर तुम्ही काहिओ प्रोफेशनल कोर्सेससुद्धा (Professional courses) करू शकता. हे कोर्सेस कोणते आहेत याबद्दल माहिती जाऊन घेऊया. Career After 12th: निकाल तर लागला, पण आता पुढे काय? कुठल्या क्षेत्रात कोणते कोर्सेस उत्तम; इथे मिळेल माहिती प्रोफेशनल कोर्सेस सीए- चार्टर्ड अकाउंटन्सी (CA) सीएस- कंपनी सेक्रेटरी (CS) बॅचलर इन फॉरेन लँग्वेज (Bachelor in Foreign Language) डिझाईन कोर्सेस (Design Courses)
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Board Exam, Education, Exam Fever 2022, Exam result, HSC

  पुढील बातम्या