सरकारी नोकरीत ग्रॅज्युएट्स आणि 12वी पासना संधी, 182 जागांवर भरती

Cag Recruitment 2019 - तुम्हाला नोकरीची चांगली संधी आहे. त्याबद्दल घ्या जाणून

Cag Recruitment 2019 - तुम्हाला नोकरीची चांगली संधी आहे. त्याबद्दल घ्या जाणून

  • Share this:
    मुंबई, 01 सप्टेंबर : तुम्ही खेळाडू आहात? आणि नोकरी शोधताय? मग चांगली संधी आहे. भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभागात 182 जागांवर भरती केली जाईल. या जागा खेळाडूंसाठी ठेवल्यात. यात क्रिकेट (पुरुष), फुटबॉल (पुरुष), हॉकी (पुरुष), बॅडमिंटन (पुरुष आणि महिला) आणि टेबल टेनिस (पुरुष आणि महिला) हे क्रीडा प्रकार आहेत. पद आणि पद संख्या लेखापाल, लेखा परीक्षक ( खेळाडू ) - 48 अकाउंटंट आणि क्लार्क - 134 PNB च्या FD व्याजात मोठे बदल, 'हे' आहेत नवे दर शैक्षणिक पात्रता लेखा परीक्षक आणि लेखापाल म्हणजेच ऑडिटर या पदासाठी पदवीधर हवं. आंतरराष्ट्रीय स्पर्धा किंवा आंतरविद्यापीठ स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारे खेळाडू हवेत. अकाउंटंट आणि क्लार्क पदासाठी 12 वी उत्तीर्ण हवं. आंतरराज्य, आंतरविद्यापीठ, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व हवं. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच महागाईचे चटके, स्वयंपाकाचा गॅस 'इतका' झाला महाग वयाची अट 30 सप्टेंबर 2019 रोजी 18 ते 27 वर्ष पूर्ण हवीत. SC/ST यांना वयात 10 वर्ष सवलत, तर OBC ना 8 वर्ष सूट हवी. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत असेल. अर्जाची फी नाही. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2019. अधिक माहितीसाठी https://cag.gov.in/ इथे क्लिक करा. तसंच  तुम्हाला भारतीय नौदलात काम करण्याची चांगली संधी आहे. नौदलात ग्रुप सी, नाॅन गॅजेटेड पदासाठी व्हेकन्सी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15 सप्टेंबर. ग्रुप सीमध्ये ज्या पदांसाठी व्हेकन्सी आहे ती आहेत सफाई कामगार, पेस्ट कंट्रोल कामगार, कुक आणि फायर इंजिन ड्रायव्हर. या पदांसाठी सॅलरी पॅकेज 18 हजारापासून 69,100 रुपयापर्यंत आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 18 ते 30 वर्षापर्यंत हवं. SBI ग्राहकांसाठी खूशखबर! आजपासून स्वस्त होणार 'या' गोष्टी, वाचतील तुमचे पैसे कुठल्या पदासाठी किती जागा? सफाई कामगार - 9 पदं पेस्ट कंट्रोल कामगार - 2 पदं कुक - 1 पद फायर इंजिन ड्रायव्हर - 1 पद Ganesh Chaturthi 2019: गणेशोत्सवात भारताबाहेर असलेल्या सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचा देखावा
    Published by:Sonali Deshpande
    First published: