Elec-widget

सप्टेंबरच्या सुरुवातीलाच महागाईचे चटके, स्वयंपाकाचा गॅस 'इतका' झाला महाग

सप्टेंबरच्या सुरुवातीलाच महागाईचे चटके, स्वयंपाकाचा गॅस 'इतका' झाला महाग

Gas Cylinder, Price Hike - स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत किती वाढ झालीय ते पाहा

  • Share this:

मुंबई, 01 सप्टेंबर : सप्टेंबर महिन्याची सुरुवातच महागाईनं झालीय. पहिल्याच दिवशी जीवनावश्यक गोष्टी महाग झाल्यात. ऑइल कंपन्यांनी आजपासून ( 1 सप्टेंबर ) सबसिडी नसलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत 16 रुपयांनी वाढवलीय. तर इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड ( IGL )नं CNGच्या किमतीत 50 ते 55 पैसे प्रति किलो वाढ केलीय. यामुळे आता कार चालवणं महाग झालंय.

महाग झाला स्वयंपाकाचा गॅस

देशातली सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल काॅर्पोरेशन ( IOC )च्या वेबसाइटप्रमाणे राजधानीत दिल्लीत आता सबसिडी नसलेला 14.2 किलोग्रॅमचा स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर 590 रुपयांना मिळेल. ऑगस्टमध्ये याची किंमत 574.50 रुपये होती. मुंबईत हा सिलेंडर 546.50 रुपयांऐवजी 562 रुपयांना मिळेल. कोलकत्त्यात 601 रुपयांचा सिलेंडर 616.50 रुपयांना मिळेल. चेन्नईत याची किंमत 590.50 रुपये होती. आता ती 606.50 रुपये आहे. याशिवाय 19 किलोग्रॅम सिलेंडरची किंमत मुंबईत 1008.50 रुपये, दिल्लीत 1054.50 रुपये, कोलकत्त्यात 1114.50 रुपये, चेन्नईत 1174.50 रुपये आहे. गेले दोन महिने सिलेंडरच्या किमतीत लागोपाठ घसरण झाल्यानंतर ही वाढ झालीय.

नौदलात 'या' पदांसाठी व्हेकन्सी, पगार आहे 69,000 रुपयापर्यंत

सणासुदीच्या दिवसांत स्वयंपाकाचा गॅस महाग झाल्यानं जनता चिंतेत पडलीय. आता गणेशोत्सव, नंतर नवरात्र, दसरा, दिवाळी या काळात स्वयंपाकाच्या गॅसचा वापर जास्त होत असतो.

Loading...

SBI ग्राहकांसाठी खूशखबर! आजपासून स्वस्त होणार 'या' गोष्टी, वाचतील तुमचे पैसे

दिल्ली-एनसीआरमध्ये IGL नं CNG चे दर वाढवलेत. IGL नं दिल्ली-एनसीआर, नोएडा, गाजियाबाद आणि गुरग्राम इथे सीएनजीचे दर वाढवलेत. दिल्ली, रेवाडी, गुरुग्राम आणि करनाल इथे 50 पैसे तर नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाजियाबाद इथे सीएनजी 55 पैशांनी महाग झालीय.

VIDEO: महिला बस चालकाचा इंगा! मुलींना छेडणाऱ्याला फिल्मी स्टाईलनं मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2019 03:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...