मुंबई, 01 सप्टेंबर : पंजाब नॅशनल बँकेनं ( PNB ) फिक्स्ड डिपाॅझिट ( FD ) दरांमध्ये बदल केलाय. PNB नं 2 कोटी रुपयांहून कमी असलेल्या FD च्या व्याज दरांत 0.50 टक्के घट केलीय. आजपासून ( 1 सप्टेंबर ) हे नवे दर लागू होतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट कमी केल्यानंतर सर्व बँका आपल्या फिक्स्ड डिपाॅझिट (FD)च्या व्याज दरात बदल करतायत. PNB 2 कोटी रुपयांहून कमी असलेल्या FD वर 7 ते 14 दिवसांच्या आणि 15 ते 29 दिवसांच्या मॅच्युरिटीवर 4.5 टक्के व्याज देतंय. तर ज्येष्ठ नागरिकांना 5 टक्के व्याज दर देतंय. याआधीचे दर 5 टक्के आणि 5.50 टक्के होते. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच महागाईचे चटके, स्वयंपाकाचा गॅस ‘इतका’ झाला महाग PNBचे बदललेले व्याज दर ( 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ) 7 ते 14 दिवस - 4.50 % 15 ते 29 दिवस - 4.50 % 30 ते 45 दिवस - 4.50 % 46 ते 90 दिवस - 5.50 % 91 दिवस ते 179 दिवस - 5.50 % 180 दिवस ते 270 दिवस - 6 % SBI ग्राहकांसाठी खूशखबर! आजपासून स्वस्त होणार ‘या’ गोष्टी, वाचतील तुमचे पैसे 271 दिवस ते 1 वर्षांहून कमी - 6.25% 333 दिवस - 6.30 % 1 वर्ष ते 555 दिवस - 6.60 % 1 वर्षाहून जास्त आणि 3 वर्षांहून कमी - 6.50 % 3 वर्षांहून जास्त आणि 5 वर्षांहून कमी - 6.50 % 5 वर्षांहून जास्त आणि 10 वर्षांहून कमी - 6.50 % नौदलात ‘या’ पदांसाठी व्हेकन्सी, पगार आहे 69,000 रुपयापर्यंत देशाची तिसरी मोठी सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक (PNB ) . या बँकेत लवकरच तीन छोट्या बँकांचं विलीनीकरण होणार आहे. या बँका आहेत ओरियंटल बँक ऑफ काॅमर्स ( OBC ), आंध्र बँक ( Andhra Bank ) आणि अलाहाबाद बँक (Allahabad Bank ) यांचा समावेश आहे. या आधी बँक ऑफ बडोदामध्ये देना बँक आणि विजया बँक यांचं विलीनीकरण झालं होतं. विजया बँक आणि देना बँकच्या विलीनीकरणानंतर बँक ऑफ बडोदा देशातली सर्वात मोठी सरकारी बँक बनली. VIDEO: ‘आघाडीची हवा संपली हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही’, मुख्यमंत्री फडणवीस यांची तुफान फटकेबाजी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.