मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Board Exam Tips: गणिताचा अभ्यास म्हणजे डोक्याला ताप; पण चिंता नको; बघा संपूर्ण पेपर पॅटर्न; एका क्लिकवर

Board Exam Tips: गणिताचा अभ्यास म्हणजे डोक्याला ताप; पण चिंता नको; बघा संपूर्ण पेपर पॅटर्न; एका क्लिकवर

या टिप्समुळे व्हाल Topper

या टिप्समुळे व्हाल Topper

गणिताच्या पेपरचं संपूर्ण परीक्षा पॅटर्न आणि महत्त्वाचे प्रश्न माहिती असले की टेन्शन कमी होतं आज आम्ही तुम्हाला हीच माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 11 फेब्रुवारी: महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या परीक्षा दिवसेंदिवस जवळ येऊ लागल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे परीक्षा होऊ शकल्या नाहीत मात्र मागील वर्षीपासून पुन्हा ऑफलाईन परीक्षा सुरु झाल्या आहेत. तसंच यंदा संपूर्ण वर्ष शाळा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळाला आहे. पण कितीही अभ्यास झाला आहे असं म्हंटलं तरी एक विषय असतो ज्या विषयाचा अभ्यास कधीच झालेला नसतो. तो विषय म्हणजे 'गणित'. गणिताचा अभ्यास म्हंटलं की विद्यार्थ्यांच्या अंगावर काटा येतो. पण गणिताच्या पेपरचं संपूर्ण परीक्षा पॅटर्न आणि महत्त्वाचे प्रश्न माहिती असले की टेन्शन कमी होतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गणिताच्या बीजगणिताच्या पेपरची हीच माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे गणिताचे दोन पेपर होणार आहेत. यामध्ये बीजगणित आणि भूमिती असे दोन वेगळे पेपर्स होणार आहेत.  त्यापैकी गणिताचा दुसरा पेपर म्हणजेच भूमितीचा पेपर हा एकूण 40 मार्कांचा असणार आहे.  तसंच पेपरचं टायमिंग 2 तासांचं असणार आहे.

SSC Exam 2023 : दहावीचा पेपर कसा देणार? पाहा 100 टक्के मिळवणाऱ्या स्वरालीचा सल्ला,Video

प्रश्नांच्या नुसार पेपर पॅटर्न

Question Number 1

Question Number 1  मध्ये A आणि B हे दोन उपप्रश्न असणार आहेत. Question Number 1 A मध्ये तुम्हाला प्रत्येकी एक मार्कांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. यामध्ये एकूण प्रश्न चार असणार आहेत. तर प्रत्येक प्रश्न हा मल्टिपल चॉईस प्रश्न असणार आहे. या प्रश्नातील सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक असणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची चॉईस देण्यात येणार नाहीये. तसंच Question Number 1 B एक मार्कांचे चार प्रश्न असणार आहेत हे सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक असणार आहे.

Question Number 2

Question Number 2 मध्ये A आणि B हे दोन उपप्रश्न असणार आहेत. यामध्ये A प्रश्नमध्ये दोन मार्कांचे तीन प्रश्न विचारण्यात येणार आहेत, यापैकी कोणत्याही दोन प्रश्नाची उत्तर देणं आवश्यक असणार आहेत. तर B प्रश्नामध्ये दोन मार्काचे पाच प्रश्न असणार आहेत यापैकी कुठलेही चार प्रश सोडवणं आवश्यक असणार आहे.

BOI Recruitment: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची मोठी संधी; तब्बल 500 जागांसाठी बंपर ओपनिंग्स

Question Number 3

Question Number 3 मध्ये A आणि B हे दोन उपप्रश्न असणार आहेत. यापैकी A प्रश्नामध्ये ती मार्कांचे दोन प्रश्न असणार आहेत यापैकी एक प्रश्न सोडवायचा आहे. तर B प्रश्नामध्ये तीन मार्कांचे चार प्रश्न असणार आहेत त्यापैकी दोन प्रश्न सोडवणं आवश्यक असणार आहे.

Question Number 4

Question Number 4 मध्ये चार मार्कांचे तीन प्रश्न असणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला दोन प्रश्न सोडवायचे आहेत. हा प्रश्न नवीन असणार आहे.

IT Jobs: या मोठ्या आयटी कंपनीत Work From Home ची सुवर्णसंधी; पात्र असाल तर लगेच करा अप्लाय

Question Number 5

Question Number 5 मध्ये तीन मार्कांचे दोन प्रश्न असणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा आहे. तसंच हा प्रश्न क्रिएटिव्ह असणार आहे.

" isDesktop="true" id="829157" >

गणिताच्या बीजगणिताच्या पेपरला नक्की पेपरचं पॅटर्न कसं असणार आहे आणि या पेपरमध्ये कोणते महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत याबाबत वरील व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Board Exam, Career, Career opportunities, CBSE 10th, Ssc board