मुंबई, 06 फेब्रुवारी: सध्याच्या काळात कोणत्याही क्षेत्रात मनासारखी नोकरी मिळणं काहीसं अवघड आहे. माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्रही याला अपवाद नाही. कोरोनासह विविध कारणांमुळे जगातील काही देशांवर आर्थिक मंदीचं सावट आहे. मंदीचा परिणाम आयटी क्षेत्रावर जाणवू लागला आहे. गेल्या काही महिन्यांत दिग्गज आयटी कंपन्यांनी कामगार कपातीचं धोरण स्वीकारलं आहे. मात्र दुसरीकडे काही कंपन्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. डेल ही कम्प्युटर क्षेत्रातली एक दिग्गज कंपनी आहे. ही कंपनी वर्षभर तंत्रज्ञांची नियुक्ती करत असते. ही कंपनी आता भारतात टेक प्रोफेशनल्सची भरती करणार आहे. विशेष म्हणजे या पदासाठी `वर्क फ्रॉम होम`चा पर्यायदेखील उपलब्ध असेल. `टेकगिग डॉट कॉम`ने याविषयीची माहिती दिली आहे.
डेल ही जगातील आघाडाची कम्प्युटर फर्म आहे. सध्या ही कंपनी देशभरात विविध पदांसाठी टेक प्रोफेशनल्सच्या शोधात आहे. या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. या पदांमध्ये प्रामुख्याने प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनीअर आणि सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअरचा समावेश आहे. या पदांसाठी कंपनीच्या अटी आणि निकष काय आहेत ते जाणून घेऊया.
प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनीअर (रिमोट) या पदासाठी इच्छूक उमेदवाराकडे जागतिक क्रॉस फंक्शनल इंजिनीअर्स टीमसोबत डेल कोअर बायॉस/फीचर्स पात्र ठरवण्यासाठी फ्रेमवर्क टेस्ट तयार करण्याची आणि ऑटोमेशन सूटची चाचणी करण्याची क्षमता असावी. बायॉस ऑटोमेशन विकासासाठी नवीन तंत्रज्ञान आणि दृष्टीकोनांचे मूल्यांकन करता येणे आवश्यक आहे. बायॉस ऑटोमेशन रोडमॅप आणि इनोव्हेशनसाठी जबाबदारी घेण्याची तयारी असावी. नेक्स्ट जेन क्लायंट फ्लॅटफॉर्मसाठी बाहेरील भागीदार तसेच डेल टेक्नोलॉजीमधील इंजिनिअर्सच्या टीमसोबत डिफाईन, डिझाईन, आर्किटेक्ट ऑटोमेशन सोल्यूशनवर काम करता येणे आवश्यक आहे. की डेव्हलपमेंट पार्टनर्ससोबत तांत्रिक गोष्टींचं व्यवस्थापन करता यावं. संपूर्ण ऑटोमेशन फ्रेमवर्क आर्किटेक्चरची अंमलबजावणी करणं आणि अंमलबजावणीसाठी एचडब्लू आणि एसडब्लू इंजिनीअर्सना सहकार्य करणं गरजेचे आहे. ऑटोमेशन लिमिट वाढवण्याची तयारी असावी. तसेच नवीन ऑटोमेशनच्या संधी ओळखून किंवा नवीन ऑटोमेशन विकसित करून उत्पादन/घटक ऑटोमेशनसाठी रोडमॅपमध्ये योगदान द्यावं. ऑटोमेशन हुक, डिझाईन/कोडचा रिव्ह्यू घेणं, तांत्रिक दोष लवकर शोधणं आदी क्षेत्रांत विकास साधण्यासह सहकार्य करण्याची तयारी असावी.
लाल-पिवळा नाही तर Job Interview ला जाताना या 4 रंगांचे कपडे घाला; मग बघा चमत्कार; नोकरी तुमचीच
सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर (रिमोट) या पदासाठी इच्छूक उमेदवार UEFI FW आणि फीचर्सच्या ऑटोमेशन आणि टेस्टिंगसाठी जबाबदारी घेणारा असावा. प्रोग्रॅमचं नियोजन आणि प्रमाणीकरण टप्प्यांदरम्यान सर्व सॉफ्टवेअर आणि UEFI FW शी संबंधित समस्या सोडवण्यासाठी सक्षम असावा. उमेदवाराला प्रॉडक्टच्या नेक्स्ट जनरेशनवर काम करावं लागलं. तसंच तुम्हाला जगातील सर्वोत्तम क्लायंट तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये फीचर्सची गरज समजून घेणं, आर्किटेक्चर आणि डिझाइन UEFI FW टेस्टिंग, UEFI FW कोड डिबगिंग,सीपीयू, पीसीएच, एफडब्लू, ओएस सारख्या दुसऱ्या HW आणि SW प्लॅटफॉर्म कॉम्पोनन्ट्स सर्व्हरच्या मदतीने UEFI Fw ची टेस्टिंग यांचा समावेश असू शकतो. पण त्या पुरत्या मर्यादित नसतील. डेव्हलप, मेंटेन आणि चालू व्हॅलिडेट शेड्यूल, टाइम लाइन्स आणि डेव्हलपमेंट स्टेटससाठी टीमसोबत काम करावे लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, IT Jobs