• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Pune Job Alert: भारती विद्यापीठ पुणे इथे 'या' पदांसाठी जागा रिक्त; या पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज

Pune Job Alert: भारती विद्यापीठ पुणे इथे 'या' पदांसाठी जागा रिक्त; या पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

  • Share this:
    पुणे ,19 ऑक्टोबर: भारती विद्यापीठ पुणे (Bharti University Pune) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिकृत सूचना (Bharti Vidyapeeth Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ स्थापत्य अभियंता, वरिष्ठ आर्किटेक्ट या पदांसाठी ही भरती (Jobs in Pune)असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती वरिष्ठ स्थापत्य अभियंता (Senior Architect) वरिष्ठ आर्किटेक्ट (Senior Civil Engineer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ स्थापत्य अभियंता (Senior Architect) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंगची पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना सिव्हिल इंजिनिअर म्हणून पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर इथे 1,42,400 रुपये पगाराची नोकरी; करा अर्ज वरिष्ठ आर्किटेक्ट (Senior Civil Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून आर्किटेक्टची पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना आर्किटेक्ट म्हणून दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. ही असेल जबाबदारी वरिष्ठ स्थापत्य अभियंता (Senior Architect) - पुणे आणि इतर साईट्सला दौऱ्यावर जाणे. आपल्या वरिष्ठांशी आणि कनिष्ठांशी योग्य तो संवाद साधून काम पुढे नेणे. वरिष्ठ आर्किटेक्ट (Senior Civil Engineer) - पुणे आणि इतर साईट्सला दौऱ्यावर जाणे. आपल्या वरिष्ठांशी आणि कनिष्ठांशी योग्य तो संवाद साधून काम पुढे नेणे. अर्ज करण्यासाठीचा पत्ता सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे 411 030. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 02 नोव्हेंबर 2021 DRDO Recruitment: DRDO मध्ये परीक्षा न देताही नोकरीची मोठी संधी; असं करा Apply सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bvuniversity.edu.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: