मराठी बातम्या /बातम्या /करिअर /DRDO Recruitment: DRDO मध्ये परीक्षा न देताही नोकरीची मोठी संधी; असं करा Apply

DRDO Recruitment: DRDO मध्ये परीक्षा न देताही नोकरीची मोठी संधी; असं करा Apply

DRDO Apprentice Jobs 2021 साठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

DRDO Apprentice Jobs 2021 साठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

DRDO Apprentice Jobs 2021 साठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

  नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO Recruitment 2021) ऑफ इंडिया इथे लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना (DRDO Apprentice Jobs 2021) जारी करण्यात आली आहे. Defense Geoinformatics Research Establishment (DGRE) चंडीगढ इथे अप्रेन्टिस म्हणून नोकरीची संधी मिळणार आहे. 27 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती आणि जाहिरात जारी झाल्यापासून 21 दिवसांच्या आत अर्ज सादर करता येणार आहे.

  या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी प्रथम राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रोत्साहन योजना (NAPS) apprenticeshipindia.org या पोर्टलवर आपली नोंदणी करणं आवश्यक आहे. एकदा नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईट www.drdo.gov.in वर ऑनलाईन सादर करावा लागेल.

  Nagpur Metro Recruitment: महाराष्ट्र मेट्रो रेल नागपूर इथे नोकरीची संधी

  अधिकृत अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे 48 प्रशिक्षणार्थींची भरती केली जाईल. एकूण रिक्त जागांपैकी 28 पदे आयटीआय प्रशिक्षणार्थींसाठी रिक्त आहेत, 18 पदे पदविका प्रशिक्षणार्थींसाठी आणि दोन पदे पदवीधर प्रशिक्षणार्थीसाठी आहेत.

  ही असेल पात्रता

  डिप्लोमा अॅप्रेंटिस (Diploma Apprentice) - उमेदवारांनी सिव्हिल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. आयटीआय प्रशिक्षणार्थी पदांसाठी, उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.

  पदवीधर प्रशिक्षणार्थी (Degree Apprentice) - या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांनी गणित किंवा सांख्यिकी किंवा भौतिकशास्त्रात बीएससीची पदवी असणं आवश्यक आहे.

  इतका मिळेल Stipend

  ITI अप्रेन्टिस - 7,000 रुपये प्रतिमहिना

  डिप्लोमा अप्रेन्टिस - 8,000 रुपये प्रतिमहिना

  डिग्री अप्रेन्टिस - 9,000 रुपये प्रतिमहिना

  अशी होणार निवड

  उमेदवारांची निवड त्यांच्या शैक्षणिक गुणांद्वारे गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.

  MSEDCL Recruitment: महावितरण पुणे इथे 12वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती

  संचालक, संरक्षण प्रयोगशाळा, चंदीगड यांनी स्थापन केलेले मंडळ सर्व प्राप्त अर्जांची छाननी करेल आणि पात्रता परीक्षेत त्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड करेल.

  असं करा अप्लाय

  सुरुवातीला drdo.gov.in वर DRDO च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

  मुख्यपृष्ठावर, 'What’s new' टॅबवर जा आणि संबंधित लिंकवर क्लिक करा

  जाहिरातीसह जोडलेल्या अर्जाच्या प्रोफार्माची प्रिंटआउट डाउनलोड करा.

  सर्व आवश्यक तपशील भरा आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह त्याची एक प्रत स्कॅन करा

  सर्व कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती आणि अर्जाचा फॉर्म PDF@ file@ Director@dl.drdo.in वर पाठवा.

  First published:
  top videos

   Tags: जॉब