मुंबई : जागतिक पातळीवर सध्या अत्यंत वाईट स्थिती सुरू आहे. तिथे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत. मेटा, ट्विटरपाठोपाठ आता आणखी काही कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
अॅमेझॉन ई-कॉमर्स कंपनीही मोठ्या प्रमाणावर ऑफिस बंद करण्याच्या तारीत आहे का असा प्रश्न पडला आहे. याचं कारण म्हणजे 18 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत आहे. अॅमेझॉनने बुधवारी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. "अनिश्चित अर्थव्यवस्थेमुळे" कर्मचारी कपात करणार असल्याचं सांगितलं आहे.
सीईओ अँडी जेसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये आम्ही जे जाहीर केलं त्यानुसार आमची भूमिका स्पष्ट आहे. जवळपास 18 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. 2022 नोव्हेंबरमध्ये अमेझॉनने जवळपास 10 हजार कर्मचारी कामावरून काढले होते.
अमेझॉनकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंतची ही सर्वात मोठी कर्मचारी कपात असल्याचं सांगितलं जात आहे. आतार्यंत 15 लाख कर्मचारी अमेझॉनसोबत काम करत होते. त्यापैकी 10 हजार कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरमध्ये काढण्यात आलं. आता पुन्हा 18 हजार कर्मचाऱ्यांना काढलं जाणार आहे.
न सांगता मोठा लंच ब्रेक का घेतला म्हणून नोकरीवरून काढलं; आणि पुढे जे घडलं ते वाचून वाटेल आश्चर्य
Our CEO Andy Jassy just shared a message to Amazon employees. https://t.co/cw5Dl6WY84
— Amazon News (@amazonnews) January 5, 2023
आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक मंदीचं सावट आहे. त्यामुळे कंपन्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करत आहेत. कंपन्यांना इन्फ्रास्ट्रक्चर आणि तिथलं भाडं कमी करायचं असल्याने कर्मचाऱ्यांची कपात सुरू झाली आहे.
मोठी बातमी! 2023मध्ये जगभरात आर्थिक मंदीचं सावट; IMF च्या प्रमुखांनी दिला चिंता वाढवणारा गंभीर इशारा
IT सेक्टरमध्ये देखील यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. भारतातील कंपन्यांची सध्या स्थिती ठिक असली तरी याचा याला परिणाम भारतावर आणि शेअर मार्केटवर कसा होतो ते देखील पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amazon