मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

आता Amazon देणार धक्का! टॉप मॅनेजर्ससह तब्बल 20,000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ? रिपोर्ट्सची माहिती

आता Amazon देणार धक्का! टॉप मॅनेजर्ससह तब्बल 20,000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ? रिपोर्ट्सची माहिती

 20,000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ?  20,000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ?

20,000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ? 20,000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ?

Amazon ही आपल्या टॉप मॅनेजर्ससह तब्बल 20,000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ देणार आहे अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट्सकडून मिळाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 05 डिसेंबर: गेल्या काही दिवसांपासून जगभरातील एक मोठ्या कंपन्याआपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. मेटा, फेसबुक, oyo सारख्या दिग्गज कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एका नोटीसवर कामावरून काढलं आहे. त्यात आता ईकॉमर्स कंपनी Amazon ही आपल्या टॉप मॅनेजर्ससह तब्बल 20,000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ देणार आहे अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट्सकडून मिळाली आहे. त्यामुळे भारतातील कर्मचाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

अमेझॉननं येत्या काही महिन्यांत वितरण केंद्रातील कर्मचारी, तंत्रज्ञान कर्मचारी आणि कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह्ससह 20,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढूनटा कण्याची योजना आखली आहे, ज्यात किरकोळ आणि क्लाउड कॉम्प्युटिंग एम्प्लॉईज आहेत असं कॉम्प्युटरवर्ल्डच्या अहवालात म्हटलं आहे.

महिन्याचा तब्बल 1,80,000 रुपये पगार अन् पात्रता फक्त ग्रॅज्युएशन; सरकारी नोकरीसाठी करा अप्लाय

Amazon कर्मचार्‍यांना लेव्हल 1 ते लेव्हल 7 पर्यंत रँक केलं आहे आणि सर्व स्तरावरील कर्मचार्‍यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे, मीडियाच्या अहवालातून हा रिपोर्ट येणं म्हणजे Amazon नं खरंच मनाची तयारी केली आहे असं दिसत आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या कर्मचाऱ्यांवर गदा येणार याबाबत सांशंकता आहे.

गेल्या काही दिवसांपासून कंपनी व्यवस्थापकांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी सुमारे 20,000 लोकांना कामावरून काढून टाकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून कर्मचार्‍यांमध्ये कामाच्या कामगिरीच्या समस्या ओळखण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच स्वतःच्या कमाचा रिपोर्टनुसार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं जाऊ शकतं.

Maharashtra Police Bharti: लेखी परीक्षेतील गणित म्हणजे स्वप्नातलं 'भूत'; आताच बघा सिलॅबस; अन्यथा....

Oyo मध्येही कर्मचाऱ्यांची कपात

हॉस्पिटॅलिटी चेन OYO ने शनिवारी आपल्या कर्मचाऱ्यांच्या छाटणीची माहिती दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, तिच्या एकूण 3700 कर्मचाऱ्यांपैकी ती 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहे. नवीन कर्मचारी नियुक्त करणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. संस्थात्मक बदलांमुळे आपला निर्णय घेण्यात येत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तो त्याच्या व्यवसायाची पुनर्रचना करत आहे.

Maharashtra Talathi Bharti: तब्बल 4122 जागांसाठी भरती; पण तुम्ही किती एलिजिबल? इथे मिळेल A-Z माहिती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, OYO ने आपल्या टेक्नॉलॉजी आणि प्रोडक्ट टीममधील या 600 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. प्रकल्प बंद पडल्यामुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला. इतर कर्मचाऱ्यांना अन्य संघात हलवण्यात आले आहे. कंपनीने शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की ती आपल्या विक्री संघासाठी सुमारे 250 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करेल.

First published:

Tags: Amazon, Career, Career opportunities, Job, Job alert