मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Maharashtra Police Bharti: लेखी परीक्षेतील गणित म्हणजे स्वप्नातलं 'भूत'; आताच बघा सिलॅबस; अन्यथा....

Maharashtra Police Bharti: लेखी परीक्षेतील गणित म्हणजे स्वप्नातलं 'भूत'; आताच बघा सिलॅबस; अन्यथा....

'गणित' विषयाचा संपूर्ण सिलॅबस

'गणित' विषयाचा संपूर्ण सिलॅबस

Maharashtra Police Bharti: या अंतर्गत होणारी लेखी परीक्षेचा सिलॅबस नक्की कसा असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आम्ही तुम्हा देणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 03 डिसेंबर: राज्यात नुकतीच महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारनं तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रानातील तरुणांना पोलीस होण्याचा गोल्डन चान्स मिळणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. तसंच 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र ही भरती प्रक्रिया होणार तरी कशी? तसंच या अंतर्गत होणारी लेखी परीक्षेचा सिलॅबस नक्की कसा असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आम्ही तुम्हा देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

नक्की कशी होणार परीक्षा

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 प्रक्रियेत दोन चाचण्या घेण्यात येणार आहेत. यामध्ये शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी होणार आहे. सुरुवातीला उमेदवारांची शारीरिक परीक्षा होणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षांच्या पॅटर्नबद्दल जाणून घेऊया.

Maharashtra Talathi Bharti: तब्बल 4122 जागांसाठी भरती; पण तुम्ही किती एलिजिबल? इथे मिळेल A-Z माहिती

अशी असेल लेखी परीक्षा

100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. परीक्षा मराठीतूनच होणार आहे. परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.

क्या बात है! लाखो रुपये पॅकेज त्यात वर्क फ्रॉम होम जॉब्स; Wipro मध्ये बंपर ओपनिंग्स

असा असेल गणित विषयाचा सिलॅबस

संख्या व संख्याचे प्रकारबेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर
वर्ग व वर्गमूळघन व घनमूळ
शेकडेवारीकसोट्या
म.सा.वी आणि ल.सा.वी.पूर्णाक व त्याचे प्रकार
अपूर्णांक व त्याचे प्रकारभागीदारी
गुणोत्तर व प्रमाणसरासरी
दशमान पद्धतीनफा-तोटा
काळ, काम, वेगसरळव्याज व चक्रवाढ व्याज
घड्याळावर आधारित प्रश्नघातांक व त्याचे नियम

गणित विषयांमध्ये एकूण पंचवीस प्रश्न विचारण्यात येणार आहे. त्यापैकी प्रतेय्क प्रश्नाला एक मार्कांचं वेटेज असणार आहे. तसंच एकूण मार्कांमध्ये स्कोर करण्यासाठी गणित येणं खूप आवश्यक असणार आहे. त्यामुळे तुम्हालाही हे गणिताचं भूत उतरवायचं असेल तर सिलॅबसनुसार अभ्यास करणं आवश्यक आहे.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Maharashtra police, Mumbai police