नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : गाडी चालवताना कधीही कोणताही अपघात होऊ शकतो. त्यामुळे ड्रायव्हिंगवेळी काही विशेष गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. गाडीतील इतर लोकांच्या आयुष्याचाही विचार करणं गरजेचं असतं. ड्रायव्हरच्या एका चूकीमुळे दुसऱ्याचं जीवन धोक्यात येऊ शकतं. अनेकदा गाडीचं स्टेअरिंग फेल झाल्याने इतक्या लोकांचा जीव गेला, अनेक जण जखमी झाले अशा अनेक बातम्या ऐकिवात आहेत. त्यामुळे काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कार चालवताना अचानक स्टेअरिंग फेल होतं, त्यामुळे ड्रायव्हर गोंधळून जातात. परंतु काही गोष्टी लक्षात ठेवल्यास, तुमच्या गाडीचं स्टेअरिंग फेल होण्याआधी तुम्हाला समजेल आणि त्यावर सहजपणे कंट्रोल करता येईल.
Tata ची SUV Tata Punch भारतात लाँच, जाणून घ्या जबरदस्त कार्सचे फीचर्स आणि किंमत
स्टेअरिंग फेल झाल्याचं कसं समजेल? - गाडी वळवताना आवाज येत असल्यास, हे स्टेअरिंग फेल होण्याचे संकेत असू शकतात. - गाडी स्टार्ट करताना हुडखालून आजाव आला, तर स्टेअरिंग व्हिल योग्य स्थितीत नसल्याचं समजू शकता. हा स्टेअरिंग फेल होण्याचा संकेत आहे. - स्टेअरिंगमध्ये वायब्रेशन वेगात झाल्यास, हेदेखील स्टेअरिंग फेल होण्याचा इशारा ठरू शकतात. - स्टेअरिंग वळवताना चाक तुम्हाला ज्या दिशेला वळवायचं आहे, त्याच दिशेला न वळल्यास हे स्टेअरिंगमध्ये फ्लूड लेवल कमी झाल्याचे संकेत आहेत. - गाडीच्या पॉवर स्टेअरिंगचा द्रव पदार्थ लाल रंगाचा असतो, यात एक विचित्र वासही असतो. जर तेल जुनं झालं, तर त्याचा रंग काळा होतो. त्यासाठी फ्लूडचा रंग लाल असणं गरजेचं आहे. याकडे लक्ष न दिल्यास, हे स्टेअरिंग फेलचे संकेत असू शकतात.