नवी दिल्ली, 03 जून : TVS मोटर कंपनीच्या TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरला भारतीय बाजारपेठेत विशेषत: 2022 मध्ये खूप लोकप्रियता मिळाली आहे. कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, बॅटरीवर चालणाऱ्या या स्कूटरचे जून 2022 मध्ये 4,667 युनिट्स विकल्या आहेत. ऑटोमेकरने दिलेल्या माहितीनुसार, TVS iQube इलेक्ट्रिकची आतापर्यंतची ही सर्वाधिक विक्री आहे. TVS iQube स्कूटरच्या नुकत्याच लाँच झालेल्या नवीन मॉडेलमध्ये अनेक अपडेट्स करण्यात आले आहेत. स्कूटरला जास्त मागणी असताना अपडेटेड मॉडेलची जास्त चर्चा आहे. इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल अनेक शानदार वैशिष्ट्ये, जादा रेंज आणि अनेक डिजाइन अपडेटसह लॉन्च करण्यात आले आहे. स्कूटर TVS iQube, iQube S आणि iQube ST या तीन प्रकारांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. स्कूटरची किंमत माहीत आहे का? TVS iQube ची किंमत दिल्लीमध्ये ₹98,654 आणि बेंगळुरूमध्ये ₹111,663 पासून सुरू होते, तर iQube S दिल्लीमध्ये ₹108,690 आणि बेंगळुरूमध्ये ₹119,663 (सर्व किंमती, ऑन-रोड) पासून उपलब्ध आहेत. iCube ST ची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु ती आधीपासूनच Rs.999 च्या किमतीत बुकिंगसाठी उपलब्ध आहे. वेगवेगळे कलर - स्कूटरच्या नवीन 2022 मॉडेलमध्ये इतर अनेक अपडेट देखील आहेत. ही स्कूटर आता विविध रंगांमध्ये उपलब्ध आहे. नवीन रंग पर्यायांमध्ये शायनिंग रेड, टायटॅनियम ग्रे, मर्क्युरी ग्रे, कॉपर ब्रॉन्झ, मिंट ब्लू, कॉर्पोरेट ब्रॉन्झ, ल्युसिड यलो, स्टारलाईट ब्लू, कोरल सँड, कॉपर ब्रॉन्झ मॅट आणि टायटॅनियम ग्रे मॅट यांचा समावेश आहे. हे वाचा - भारताचं मोठं करतब! पायलटशिवाय फाइटर एअरक्राफ्टचं यशस्वी उड्डाण; पाहा VIDEO इतर वैशिष्ट्ये - स्कूटरमध्ये 32-लिटर कॅपेसिटिव्ह अंडर-सीट स्टोरेज आहे. दोन हेल्मेट ठेवण्यासाठी पुरेशी जागा असल्याचा दावा कंपनीने केला आहे. iQube च्या बेस व्हेरियंटला 5.0-इंचाचा कलर TFT डिस्प्ले मिळतो, तर S आणि ST व्हर्जनला आता 7.0-इंचाचा TFT डिस्प्ले मिळतो. एवढेच नाही तर iQubeST मध्ये टचस्क्रीन देखील आहे. यात अलेक्साचे फिचर आहे, त्यातून चार्जिंगशी संबंधित प्रश्नांची माहिती मिळते. हे वाचा - आता फक्त 19 रुपयांमध्ये ऍक्टिव्ह राहणार सिम, या कंपनीचा नवा प्लान लॉन्च! या स्कूटर्सच्या विक्रीत मोठी झेप आईक्यूब या सेगमेंटमध्ये बजाज चेतक इलेक्ट्रिक आणि ओला एस -1 प्रो सारख्या इतर इलेक्ट्रिक स्कूटरशी टक्कर देणारी ही स्कूटर ठरत आहे. बाजारात बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची मागणी वाढत असताना, चेतक इलेक्ट्रिक आणि सिंपल वन ई-स्कूटर यासारख्या इतर उत्पादनांच्या विक्रीत वाढ होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.