मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Unmanned Aircraft Video : संरक्षण क्षेत्रात भारताचं मोठं करतब! पायलटशिवायच फाइटर एअरक्राफ्टचं यशस्वी उड्डाण

Unmanned Aircraft Video : संरक्षण क्षेत्रात भारताचं मोठं करतब! पायलटशिवायच फाइटर एअरक्राफ्टचं यशस्वी उड्डाण

मानवरहित एयरक्राफ्ट विकसित करण्यात यश, कर्नाटकात पहिल्या विमानाचं उड्डाण

मानवरहित एयरक्राफ्ट विकसित करण्यात यश, कर्नाटकात पहिल्या विमानाचं उड्डाण

Unmanned Aircraft: डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात डीआरडीओने विकसित केलेल्या मानवरहित विमानाची आज कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंजवर यशस्वी चाचणी घेण्यात आली. DRDO अंतर्गत येणारी बेंगळुरू स्थित संशोधन प्रयोगशाळा एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने या मानवरहित विमानाचं डिझाइन तयार केले आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 01 जुलै: संरक्षण क्षेत्रात भारताला सर्वात मोठं यश मिळालं आहे. भारताने पायलटशिवायच फाइटर एअरक्राफ्टचं यशस्वीरित्या उड्डाण करून दाखवलं आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO)  विकसित केलेल्या मानवरहित एयरक्राफ्टची (Unmanned Aircraft) आज कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंजवर यशस्वी चाचणी घेण्यात आली.

अलीकडच्या काळात भारताने संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णतेला विशेष महत्त्व दिलं आहे. याचीच परिणती म्हणून डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात DRDO सह देशातील इतर संस्थांनी देशातच संरक्षण साहित्याच्या विकासावर लक्ष केद्रीत केलं आहे. अलीकडेच DRDO मानवरहित एयरक्राफ्ट (First Unmanned Aircraft) विकसित करण्यात यश मिळालं होतं.शुक्रवारी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे या मानवरहित विमानाची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली.

DRDO अंतर्गत येणाऱ्या बेंगळुरू स्थित संशोधन प्रयोगशाळा प्रयोगशाळा एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने या मानवरहित एयरक्राफ्टचं डिझाइन तयार केले आहे. विमानासाठी वापरण्यात येणारी एअरफ्रेम, एव्हीओनिक सिस्टीम आणि इतर गोष्टींची निर्मिती देशातच करण्यात आली आहे.

हेही वाचा- Smartphone वाचवेल तुमचा जीव! अपघात झाला तर थेट इमरजन्सी नंबरवर कॉल

मानवरहित एयरक्राफ्ट 'अभ्यास'ची यशस्वी चाचणी (Succesful Test of First Unmanned Aircraft):

याआधी बुधवारी, स्वदेशी हाय स्पीड एक्स्टेंडेड टार्गेट मानवरहित विमान 'अभ्यास'ची (Abhyas) ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली. पंरतु या विमानाने कमी उंचीवर उड्डाण केले. ITR द्वारे तैनात केलेल्या रडार इलेक्ट्रो ऑप्टिकल टार्गेटींग सिस्टमसह विविध साधनांद्वारे चाचणीचे परीक्षण केले गेले.

हेही वाचा- एका फोन कॉलमध्ये होईल तुमचं बँक अकाऊंट रिकामं, पश्चाताप टाळण्यासाठी लगेच करा 'हे' उपाय

डीआरडीओच्या ‘या’ संस्थेत तयार झालं ‘अभ्यास’चं डिझाईन-

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) च्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने या विमानाची रचना आणि विकास केला आहे. पूर्णपणे स्वयंचलित उड्डाण करता यावं अशा पद्धतीने या विमानाची रचना करण्यात आली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी मानवरहित विमान ‘अभ्यास’च्या यशस्वी उड्डाणाबद्दल डीआरडीओ आणि सशस्त्र दलांचे अभिनंदन केले. या प्रणालीच्या विकासामुळे हवाई लक्ष्यांची आवश्यकता पूर्ण करण्यात मदत होईल, असं ते यावेळी म्हणाले.

First published:

Tags: Rajnath singh, Technology