अलीगढ, 07 एप्रिल: वाहतूक उल्लघंनाची एक अजब घटना समोर आली आहे. हेल्मेट परिधान न केल्यामुळं एका कार ड्रायव्हरला (Car driver not wear helmet) वाहतूक पोलिसांनी 1000 रुपयांची पावती फाडली (Traffic police sent E-Challan) आहे. यामुळे कार ड्रायव्हरला तर धक्का बसलाच आहे, पण वाहतूक पोलिसही चक्रावले आहेत. एका शिक्षण अधिकाऱ्याशी संलग्न असणाऱ्या एका कारला हा दंड आकारण्यात आला आहे. आपण ज्या गाडीची पावती फाडली आहे, ती दुचाकी नसून कार आहे, ही बाब लक्षात आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी सारवासारव केली आहे. संबंधित घटना उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील आहे. ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांकडून स्पष्टीकरण दिलं जात आहे. यासंबंधित माहिती देताना अलीगढ वाहतूक एसपी सतिश चंद्र यांनी सांगितलं की, ई-चलनापासून वाचण्यासाठी लोकं चुकीच्या नंबर प्लेटचा (fake number plates) वापर करत आहेत. ज्यामुळे हेल्मेट परिधान न केल्याच्या गुन्ह्यात एका कार ड्रायव्हरला पावती फाडण्यात आली आहे. सध्या शहरात बनावट नंबर प्लेट वापरणाऱ्या गाड्यांवर कारवाई केली जात आहे. तसेच दोषींकडून 5000 रुपये दंड आकारण्यात येत आहे. (हे वाचा- ‘या’ बँकांच्या एटीएममधून कार्डशिवायही काढता येतील पैसे ) अलीगढचे एसपी ट्रॅफिक सतिश चंद्र यांनी सांगितलं कि, शहरात अनेक ठिकाणी मन्युअल पावती फाडण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस नियमांच उल्लंघन करणाऱ्यांचे फोटो काढून त्यांना चलन पाठवत आहेत.पण शहरातील बरेच लोकं ई-चलनापासून वाचण्यासाठी नंबर प्लेटमध्ये छेडछाड करत आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. (हे वाचा- ….आणि बहाद्दराने थेट पोलिसाच्या अंगावरच घातली गाडी ) एसपींनी पुढे सांगितलं की, ज्या कारची पावती फाडली आहे. त्या गाडीचा नंबर एका मोटारसायकला लावण्यात आला आहे. त्यामुळे ही चुक झाली आहे. अशाप्रकारच्या घटना जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा एक अर्ज दिल्यानंतर कारवाई मागे घेतली जाते. असं असलं तरी हेल्मेट परिधान न केल्यानं संबंधित कार चालकाला 1000 रुपयांची पावती फाडल्याचं प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आहे. अशा प्रकारच्या घटना याआधीही घडल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.