Home /News /news /

....आणि बहाद्दराने थेट पोलिसाच्या अंगावरच घातली गाडी

....आणि बहाद्दराने थेट पोलिसाच्या अंगावरच घातली गाडी

वाहतुक निरीक्षक तुम्हाला थांबवू शकतात. जसे तुमच्यासाठी काही नियम आहेत तसेच त्यांच्यासाठीही नियम आहेत. ते नियम वाहतुक निरीक्षकांनी पाळणं गरजेचं असतं. प्रत्येक वाहतूक पोलीस त्यांच्या गणवेशात असणं बंधनकारक आहे. त्यावर त्यांचा बक्कल नंबर आणि नाव असायलाच हवं. या गोष्टी नसतील तर तुम्ही त्यांच्या ओळखपत्राची मागणी करून शकता. त्यांनी ओळखपत्र दाखवण्यास नकार दिल्यास तुमच्या गाडीची कागदपत्रं त्यांना देऊ नका.

वाहन थांबवण्याचा इशारा केल्यानंतर मोटार सायकलस्वाराने न थांबता थेट वाहतूक शाखा प्रमुखांच्या अंगावरच मोटार सायकल घालण्याचा प्रयत्न केला आहे.

    वीरेंद्रसिंह उत्पात, पंढरपूर, 2 फेब्रुवारी : पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथील एका वाहन चालकाने थेट पोलिसाच्या अंगावरच गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वाहन थांबवण्याचा इशारा केल्यानंतर मोटार सायकलस्वाराने न थांबता थेट वाहतूक शाखा प्रमुखांच्या अंगावरच मोटार सायकल घालण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी मल्हारी रमेश सकट (रा. शेगाव दुमाला, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) या इसमाविरुध्द शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरपूर शहरातील चौफळा चौकामध्ये कृष्णाचे मंदिराजवळ मल्हारी रमेश सकट हा (एम.एच. 13 ए.ई.290) मोटार सायकलवरू येत होता. त्यावेळी वाहतूक शाखेचे प्रमुख गणेश निंबाळकर यांनी मल्हारी सकट याला मोटार सायकल थांबवण्याचा इशारा केला. परंतु सकट याने न थांबता मोटारसायकल निंबाळकर यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मल्हारी सकट हा लोकांच्या गर्दीत भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत होता. त्यानंतर त्याला पोलीस अंकुश रामचंद्र वाघमारे यांनी थांबवत होते. परंतु त्याने वाघमारे यांच्या छातीवर जोरात मारुन ढकलून देऊन जखमी केले. वाघमारे यांना कायदेशीर कर्त्यव्य करण्यास अडथळा केला. दरम्यान, याप्रकरणी मल्हारी सकट याच्याविरुध्द भा.द.वि.क. 353, 332, 289, सह मोटार वाहन कायदा कलम 132/179, 236(1), /177, 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Pandharpur, Pandharpur crime

    पुढील बातम्या