'या' बँकांच्या एटीएममधून कार्डशिवायही काढता येतील पैसे

'या' बँकांच्या एटीएममधून कार्डशिवायही काढता येतील पैसे

देशातल्या काही निवडक बँका त्यांच्या ग्राहकांना आता डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड न वापरताही एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा देत आहेत. बँकेच्या म्हणण्यानुसार दररोज 10 हजार ते 20 हजार रुपये या पद्धतीने काढणं शक्य होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 एप्रिल: देशातल्या काही निवडक बँका त्यांच्या ग्राहकांना आता डेबिट कार्ड (Debit Card) किंवा क्रेडिट कार्ड (Credit Card) न वापरताही एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा देत आहेत. बँकेच्या म्हणण्यानुसार दररोज 10 हजार ते 20 हजार रुपये या पद्धतीने काढणं शक्य होणार आहे. सध्या तरी केवळ काही बँकांच्या एटीएममध्येच ही सुविधा उपलब्ध आहे. कार्डलेस विड्रॉवल अर्थात कार्डशिवाय बँकेतून पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी त्यांच्या बँकेचं मोबाइल अॅप (Mobile App) डाउनलोड करणं आवश्यक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank), बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) आणि आरबीएल बँक (RBL Bank) या बँका कार्डलेस कॅश विड्रॉवल (Cardless Cash Withdrawal) सुविधा देत आहेत. 24x7 सुरक्षितरीत्या आणि सुलभपणे भारतात कुठेही पैसे काढण्याची ही सोय आहे.

SBI कार्डलेस कॅश विड्रॉवल :

- स्टेट बँकेत खातं असलेल्यांनी योनो अॅपवर लॉगिन केल्यानंतर Yono Cash या पर्यायावर क्लिक करावं.

- ATM सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एटीएममधून किती रक्कम काढायची आहे ते लिहावं.

- त्यानंतर स्टेट बँकेकडून तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर योनो कॅश ट्रान्झॅक्शन नंबर पाठवला जाईल.

- तो नंबर आणि तुमचा पिन स्टेट बँकेच्या कार्डलेस ट्रान्झॅक्शन सुविधा असलेल्या कोणत्याही एटीएम मशिनमध्ये टाकण्यासाठी वापरावा.

- एटीएम केंद्रात गेल्यावर तिथल्या पहिल्या पेजवर card-less transaction हा पर्याय स्वीकारावा आणि त्यानंतर Yono Cash हा पर्याय निवडावा. त्यानंतर वरील माहिती तिथे टाकावी.

ICICI बँक कार्डलेस कॅश विड्रॉवल :

-'iMobile' अॅपमध्ये लॉगिन करावं. त्यात 'Services' आणि 'Cash Withdrawal at ICICI Bank ATM'हे पर्याय निवडावेत.

- त्यानंतर तुम्हाला किती रक्कम काढायची आहे ते लिहावं. तुमचा अकाउंट नंबर सिलेक्ट करावा. त्यानंतर चार अंकी टेम्पररी पिन तयार करावा आणि सबमिट करावा.

- त्यानंतर तुम्हाला लगेचच रेफरन्स ओटीपी अर्थात वन टाइम पासवर्ड येईल.

- त्यानंतर ICICI बँकेच्या कोणत्याही एटीएम केंद्राला भेट द्या आणि Cardless Cash Withdrawal हा पर्याय निवडावा.

- enter mobile number हा पर्याय निवडून नंतर 'reference OTP number' यावर जावं.

- तुमचा टेम्पररी पिन टाकावा आणि किती रक्कम काढायची आहे ते निवडावं.

बँक ऑफ बडोदाची कार्डलेस कॅश विड्रॉवल सुविधा

- BOB M-connect Mobile Banking application उघडा आणि कार्डलेस ट्रान्झॅक्शनसाठी ओटीपी तयार करा.

- BOB Mobile Banking मध्ये लॉगिन करा आणि Premium Services टॅबवर क्लिक करा.

- पुढच्या स्क्रीनमध्ये Cash on Mobile service यावर क्लिक करा.

- तुमचा खाते क्रमांक सिलेक्ट करा, किती रक्कम काढायची ते लिहा आणि सबमिट करा.

- त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल.

- तुमच्या जवळच्या बँक ऑफ बडोदा एटीएममध्ये जा. तिथे एटीएम स्क्रीनवर Cash on Mobile हा पर्याय निवडा.

- त्यानंतर ओटीपी टाकून तुम्हाला हवी ती रक्कम काढा.

(हे वाचा:बँक ऑफ बडोदाने पासवर्डबाबत दिला आहे महत्त्वाचा ALERT! हे रंग लक्षात ठेवणं आवश्यक)

कोटक महिंद्रा बँकेची कार्डलेस कॅश विड्रॉवल सुविधा

- कोटक नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग अॅपमध्ये लॉगिन करा.

- बेनिफिशियरी नेम, मोबाइल नंबर आणि पत्ता या गोष्टी भरून नोंदणी करा. ही नोंदणी एकदाच करावी लागते.

- त्यानंतर बेनिफिशियरी कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये जाऊन कार्डलेस कॅश विड्रॉवल करू शकतो. एटीएम स्क्रीनवर cardless cash withdrawal किंवा instant money transfer यापैकी एक पर्याय निवडावा. बेनिफिशियरीने मोबाइल नंबर टाकल्यावर येणारा एसएमएस कोड टाकून मग पैसे काढता येतात.

आरबीएल बँकेची कार्डलेस कॅश विड्रॉवल सुविधा

- आरबीएल बँकेच्या MoBank अॅपमध्ये लॉगिन करावं. कार्डलेस कॅश विड्रॉवर सुविधा असलेलं बँकेचं एटीएम कुठे आहे, ते त्यातून कळेल. खात्याला जोडलेला मोबाइल नंबर वापरून किंवा अॅपमध्ये दिलेल्या सोप्या स्टेप्स वापरून ही सुविधा वापरता येते. मोबाइल अॅपमध्ये गेल्यावर मिळणारा कोड वापरून पैसे काढता येतात.

First published: April 6, 2021, 10:54 PM IST

ताज्या बातम्या