नवी दिल्ली, 27 डिसेंबर : Year Ender वर्षाच्या अखेरीस अनेक कार कंपन्यांनी आपल्या काही निवडक मॉडेल्सवर बंपर डिस्काउंट देण्यास सुरुवात केली आहे. तुम्हीही नवी कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. नवीन वर्ष सुरू होण्याआधी डिस्काउंटमध्ये कार खरेदी करू शकता.
2022 च्या नव्या वर्षापासून कार्सच्या किंमती वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2021 मध्ये भारतीयांनी काही गाड्यांना मोठी पसंती दिली असून या गाड्या सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या कार्स ठरल्या आहेत. Maruti Suzuki Dzire देशात सर्वाधिक विक्री होणारी सेडान आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही कार Google वर सर्वाधिक सर्च केलेली कार ठरली आहे. या कारसाठी महिन्याला सर्च अॅव्हरेज 4.5 लाख आहे.
Tata Altroz कारने प्रीमियम हॅचबॅक स्पेसमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2021 मध्ये Google वर दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक सर्च केलेली ही कार ठरली आहे. त्याशिवाय ही कार NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवण्यातही पॉप्युलर आहे.
त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक सर्च केलेल्या कार्समध्ये Honda City असून ही भारतात लोकप्रिय सेडान आहे. 3.6 लाखहून अधिक अॅव्हरेज मंथली सर्चसह होंडा सिटी तिसऱ्या क्रमांकावर आहे.
TATA Tiago टॉप 5 मध्ये सर्च केली जाणारी चौथ्या क्रमांकावरील कार ठरली आहे. टियागो हॅचबॅक Google Search मध्ये चौथ्या क्रमांकावर असून छोट्या कार्समध्ये अतिशय पॉप्युलर मॉडेल आहे. त्याशिवाय Tiago ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार रेटिंग मिळवणारी कार आहे.
Maruti Suzuki Alto 2021 मध्ये Google Search मध्ये 3 लाखहून अधिक अॅव्हरेजसह पाचव्या क्रमांकावर आहे. Alto भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. Maruti Suzuki India 2022 मध्ये नवी जनरेशन Alto लाँच करण्याची तयारी करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Year Ender