नवी दिल्ली, 26 डिसेंबर : वर्षाच्या शेवटच्या दिवसांत कार खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. अनेक मोठ्या कार कंपन्या आपल्या कार्सवर डिस्काउंट देत आहेत. या कार्सवर डिस्काउंटसह एक्सचेंज बोनसही मिळेल. या लिस्टमध्ये कार निर्माता कंपनी मारुति सुझुकी (Maruti Suzuki), हुंदई मोटर (Hyundai) आणि टाटा मोटर्स (Tata Motors) सारख्या मोठ्या कंपन्या आहेत. या सर्व कंपन्या आपल्या लिमिटेड काळासाठी ऑफर देत आहेत. डिसेंबरमध्ये डिस्काउंट का? नवं वर्ष अगदी तोंडावर आलं असून कार निर्माता कंपनी आपल्या जुन्या कार्सचा स्टॉक हटवू इच्छित आहे. या कार्सची विक्री झाल्यानंतरच कंपन्या नव्या मॉडेलवर काम सुरू करुन त्या लाँच करतील. ग्राहकांना या कार्सवर डिस्काउंटसह एक्सचेंज ऑफरही मिळत आहे, परंतु ही सूट केवळ अशा कार्सवर मिळेल ज्या यावेळी उपलब्ध आहेत.
Second Hand Car खरेदी करताना या गोष्टींकडे लक्ष द्या, फसवणुकीपासून होईल बचाव
नवं वर्षासाठी काही दिवस बाकी असताना, ग्राहकांसाठी कार खरेदीची चांगली संधी आहे. कारण नव्या वर्षात सर्व कार कंपन्या आपल्या कार्सच्या किंमतीत वाढ करणार आहेत. रॉ मटेरियलच्या किंमती वाढत असल्याने पुढील वर्षी कारच्या दरात वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Maruti Suzuki कंपनी 37000 ते 89000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. तर Tata Motors च्या काही गाड्यांवर 77,500 ते 2.25 लाखांपर्यंतची सूट आहे. Honda च्या काही गाड्यांवर 5 लाखांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल. तर Honda Civic वर 2.55 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते.
सावधान! पुढे धोका आहे! Driving करताना हे Mobile app तुम्हाला करेल Alert
Tata च्या Hatchback Cars वर 77,500 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळतो आहे. Tata Hexa वर 2.5 लाखांची सूट मिळेल.