नवी दिल्ली, 25 डिसेंबर : सेकेंड हँड कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टींची माहिती घेणं, सतर्क राहणं महत्त्वाचं आहे. कार खरेदी करण्याआधी कारची हिस्ट्री तपासणं गरजेचं आहे. देशात सेकेंड हँड कार खरेदीकडे अनेकांचा कल वाढतो आहे. हेच पाहता ऑटोमोबाइल कंपन्या जुन्या कार्सचंही शोरुम सुरू करत आहेत. सेकेंड हँड कार खरेदी करताना केवळ टेस्ट ड्राइव्ह करणं पुरेसं नाही. त्याशिवायही काही सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.
लाँग टेस्ट ड्राइव्ह -
सेकेंड हँड कार खरेदीवेळी लाँग टेस्ट ड्राइव्ह करणं गरजेचं आहे. टेस्ट ड्राइव्ह कमीत कमी 30 किलोमीटरपर्यंत असणं गरजेचं आहे. गाडीची योग्य कंडिशन माहिती होण्यासाठी इतक्या अंतरावर टेस्ट ड्राइव्ह अतिशय आवश्यक आहे.
ब्रेक टेस्ट -
कार टेस्ट ड्राइव्हवेळी वेगात ब्रेक मारुन इमरजेन्सी ब्रेक टेस्ट करू शकता. त्याशिवाय हँड ब्रेकचंही टेस्टिंग करा.
टेस्ट ड्राइव्ह चांगल्या आणि वाइट दोन्ही रस्त्यांवर करा. आवाजासह कार सस्पेंशन, हिल एरिया, टॉर्क, पॉवर, पिकअप सारख्या गोष्टींकडेही लक्ष द्या. इंजिनमधून येणारा आवाज, हीटिंग, गियर बॉक्स, गियर रिस्पॉन्सकडेही लक्ष द्या.
गाडीच्या सायलेंसरमधून निघणाऱ्या धूराकडेही लक्ष द्या. सायलेंसरमधून काळ्या किंवा निळ्या रंगाचा धूर येत असल्यास, इंजिनमध्ये खराबी असू शकते. इंजिनमध्ये ऑइल लीकेजची समस्या असल्यास धूर काळ्या किंवा निळ्या रंगाचा असू शकतो. टेस्ट ड्राइव्हवेळी मेकेनिक सोबत असल्याचं फायद्याचं ठरू शकतं.
इन्शुरन्स, नो क्लेम बोनस -
सेकेंड हँड कार खरेदी करताना कारचा इन्शुरन्स तपासणं गरजेचं आहे. यामुळे कारच्या योग्य किंमतचा अंदाज लावता येईल. 2 ते 3 वर्षांचा नो क्लेम बोनस चेक करुन मागील वर्षात अपघात झाला आहे की नाही याबाबतही माहिती मिळू शकते.
त्याशिवाय गाडीचा चेसिस नंबरही तपासा. कागदावरील चेसिस नंबर आणि कारवरील चेसिस नंबर एकच आहे की नाही हे तपासा. दोन्हीवर वेगवेगळे बदल असल्यास कार खरेदी करू नका.
कार टेंपरेचर -
टेस्ट ड्राइव्ह घेण्याआधी कार टेंपरेचर चेक करणं आवश्यक आहे. टेंपरेचर चेक करण्यासाठी कारच्या बोनेटवर हात ठेवा, यामुळे तुमच्या आधी ही कार कोणी चालवली आहे की नाही याची माहिती मिळेल. कारचं टेंपरेचर सामान्य असलं, तरच टेस्ट ड्राइव्ह घ्या. तुमच्या आधी कोणी टेस्ट ड्राइव्ह केली असल्यास, तुम्हाला याबाबत समजणार नाही. म्हणजेच कार किती वेळात गरम होतेय हे समजणार नाही. कारची योग्य हीटिंग कंडिशन जाणून घेण्यासाठी हे गरजेचं आहे.
टेस्ट ड्राइव्हवेळी कारमधून येणाऱ्या आवाजांकडेही लक्ष द्या. त्यासाठी कार स्टार्ट करुन न्यूट्रल करा. त्यानंतर कार बसून आवाज आणि व्हायब्रेशनकडे लक्ष द्या.
स्टिअरिंग -
स्टिअरिंग चेक करणंही गरजेचं आहे. स्टिअरिंगमध्ये व्हायब्रेशन असल्यास ही समस्या ठरू शकते. कार सरळ न जाता डावीकडे, उजवीकडे जात असेल, तर ही स्टिअरिंगमधील समस्या असू शकते. त्याशिवाय विंडो अप-डाउन, म्यूजिक सिस्टम, मिरर फोल्डिंग स्विच, वायपर, हॉर्न, स्विच, ब्रेक, क्लच, गियर, एक्सिलरेटर, हेड लाइट, टेल लाइट, इंडिकेटर्स चेक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car