Home /News /auto-and-tech /

मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, कारमध्ये 'हे' फिचर्स आता बंधनकारक!

मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, कारमध्ये 'हे' फिचर्स आता बंधनकारक!

या निर्णयामुळे गाड्यांच्या किंमतीत वाढ होण्याची चिन्ह आहे.

    नवी दिल्ली, 29 डिसेंबर : गाड्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून मोदी सरकारने (Modi Goverment) आता आणखी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कारमध्ये दोन्ही बाजूने एअर बॅग्स (air bags )लावणे आता बंधणकारक असणार आहे, असा आदेशच रस्ते, परिवहन मंत्रालयाने  ( Ministry of Road Transport & Highways Government of India) काढला आहे. या निर्णयामुळे गाड्यांच्या किंमतीत वाढ होण्याची चिन्ह आहे. राज्य परिवहन मंत्रालयाने याबद्दल एक अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशानुसार, या पुढे देशातील प्रत्येक कार उत्पादक कंपन्यांना कारमध्ये चालक आणि त्यांच्या बाजूने असलेल्या सीटवर एअर बॅग्स देणे बंधणकारक असणार आहे. भाजपला मोठा धक्का, गुजरातमध्ये 'या' खासदारांनं दिली पक्षाला सोडचिठ्ठी 1 एप्रिल 2021 पासून या आदेशाची अंमलबाजवणी केली जाणार आहे. त्यामुळे 1 एप्रिलनंतर बाजारात येणाऱ्या प्रत्येक कारमध्ये तुम्हाला चालकासह बाजूच्या सीटवर सुद्धा एअर बॅग्स मिळणार आहे. तसंच, जी वाहनं सध्या बाजारात येण्यास तयारी झाली आहे, त्या वाहनांमध्ये 1 जून 2021 पर्यंत एअर बॅग्स सुविधा कार उत्पादक कंपन्यांना द्यावी लागणार आहे. कुठे हरवली माणुसकी? तरुणावर हल्ला होत असताना गर्दी VIDEO काढण्यात दंग कार चालक आणि त्याच्या बाजूच्या सीटवर जर दोन्ही बाजूने एअर बॅग्स दिली तर कारच्या उत्पादनात खर्च वाढणार आहे. परिणामी याचे पडसाद हे कारच्या किंमतीवर होणार आहे. त्यामुळे कारच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.  'जर कारच्या दोन्ही बाजूने एअर बॅग्स दिले तर कारच्या किंमतीत 4 हजार ते 6 हजार रुपये वाढ होण्याची शक्यता आहे', असं कार उत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. याआधाही कारमध्ये एअर बॅग्स देणे बंधणकारकच होते. पण, चालकाच्या समोरील सीटवर एअर बॅग दिली जात होती. काही कार उत्पादक कंपन्या या दोन्ही बाजूने कारमध्ये एअर बॅग्सची सुविधा देत होते. पण, आता कारच्या समोरील दोन्ही सीट्स समोर एअर बॅग्स द्यावीच लागणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या