अहमदाबाद, 29 डिसेंबर: गुजरातमध्ये भाजपला (Gujarat BJP) मोठा धक्का बसला आहे. भाजपचे भरुचचे खासदार मनसुख बसावा (BJP Bharuch MP Mansukh Vasava) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. खासदार मनसुख वसावा अनेक दिवसांपासून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी नाराज आहेत. त्यातून त्यांनी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी दिल्याची जोरदार चर्चा आहे.
खासदार मनसुख वसावा यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना मोठा धक्का मानला जात आहे.
हेही वाचा...राजकारण तापलं! शिवसेनेतर्फे 'या' शहरातही झळकले #wesupportSanjayRaut चे बॅनर
मिळालेली माहिती अशी की, भरुचचे भाजपचे खासदार मनसुख धनजी वसावा हे आदिवासी नेते आहेत. खासदार वसावा यांनी 28 डिसेंबरलाच गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी.आर पाटील यांना पत्र लिहून आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, मनसुख वसावा लवकरच लोकसभा सदस्यत्त्वाचा अर्थात खासदारकीचाही राजीनामा देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
Gujarat: BJP Bharuch MP Mansukh Vasava resigns from the party.
— ANI (@ANI) December 29, 2020
'माझ्याकडून झालेल्या चुकांमुळे पक्षाचं नुकसान होऊ नये, यासाठी आपण राजीनामा दिला आहे.', असं खासदार मनसुख वसावा यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
खासदार मनसुख वसावा यांनी पत्रात म्हटलं आहे की, पक्षावर माझी निष्ठा आहे. मी प्राणाणिकपणे पक्षाचं काम केलं. सोबतच पक्ष आणि जीवनाचा सिद्धांत याचं काटेकोरपणे पालक करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी एक माणूस आहे. माणसाकडून चूक होतच असते. माझ्याकडून झालेल्या चुकांमुळे पक्षाचं नुकसान होऊ नये, म्हणून आपण राजीनामा देत आहे, लोकसभेचं कामकाज सुरू होण्याआधीच आपण खासदारकीचाही राजीनामा देणार असल्याचं मनसुख वसावा यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा...रजनीकांत यांची राजकीय मैदानातून माघार, हे आहे कारण
दरम्यान, खासदार मनसुख वसावा हे नुकतेच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना देखील खासदार वसावा यांनी काही दिवसांपूर्वी पत्र लिहिलं होतं. 'गुजरातमध्ये आदिवासी महिलांची तस्करी होत आहे.', असं ते म्हणाले होते. त्याचबरोबर स्टॅच्यू ऑफ यूनिटीच्या बाबतही खासदार वसावा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. स्टॅच्यू ऑफ यूनिटीचा परिसर इको-सेंसेटिव्ह झोन रद्द करण्याची मागणी खासदार वसावा यांनी केली होती.