Home /News /auto-and-tech /

Tata Tiago च्या CNG मॉडेलचं बुकिंग सुरू, 5 हजार रुपयांत करता येणार बुक; पाहा किंमत आणि फीचर्स

Tata Tiago च्या CNG मॉडेलचं बुकिंग सुरू, 5 हजार रुपयांत करता येणार बुक; पाहा किंमत आणि फीचर्स

टाटा टियागो (Tiago) आणि टिगोरचं (Tigor) सीएनजी मॉडेल बाजारात येणार आहे. या दोन्ही कार याच महिन्यात लाँच होणार असल्याची माहिती आहे.

  नवी दिल्ली, 3 जानेवारी : CNG सेगमेंटमध्ये मारुति सुझुकी (Maruti Suzuki) आणि हुंदाईला (Hyundai) मिळालेल्या यशानंतर भारतीय कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सनेही लवकरच या सेगमेंटमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा टियागो (Tiago) आणि टिगोरचं (Tigor) सीएनजी मॉडेल बाजारात येणार आहे. या दोन्ही कार याच महिन्यात लाँच होणार असल्याची माहिती आहे. कंपनीने डीलरशिपच्या आधारे 5000 रुपयांपासून 20000 रुपयांपर्यंतच्या टोकन किंमतीवर अनऑफिशियल बुकिंग सुरू केली आहे. सीएनजी कार्सची पेट्रोल वर्जनशी तुलना केल्यास, फरक केवळ बाहेरील CNG बॅजिंगचा असेल, जो Tiago आणि Tigor ला पेट्रोल वेरिएंटपासून वेगळं ठरवेल. Tiago आणि Tigor च्या सीएनजी वेरिएंटची किंमतही वाढवली जाऊ शकते. CNG वेरिएंटची किंमत पेट्रोल वेरिएंटहून जवळपास 0,000-50,000 रुपये अधिक असू शकते. Tata Tiago CNG आणि Tata Tigor CNG एका अशा सेगमेंटमध्ये एन्ट्री करत आहेत, जिथे Maruti Suzuki आणि Hyundai च्या काही चांगल्या कार्स आधीच उपलब्ध आहेत. मारुति सुझुकीकडे एप्रिल-नोव्हेंबर 2021 काळात 82 टक्के बाजार भागीदारीसह 8 CNG मॉडेल आहेत. तर Hyundai कडे Santro, Grand i10 Nios, Aura, Xcent Prime मॉडेल आहेत. आता Tata Tiago CNG ची Maruti WagonR आणि Hyundai Grand i10 NIOS शी टक्कर असेल, तर Tigor CNG Hyundai Aura CNG शी टक्कर असेल.

  Top 5 Cars 2021 : भारतीयांनी सर्वाधिक Google Search केल्या या Cars, पाहा डिटेल्स

  काय आहे फीचर्स - Tiago CNG मध्ये कंपनी 1.2 लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिनचा वापर करू शकते. हे इंजिन 85bhp पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करेल. हे कार इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येईल. Tiago CNG वेरिएंटमध्ये पेट्रोल इंजिन मॉडेलच्या तुलनेत कमी पॉवर मिळेल. तसंच LED हाय माउंट स्टॉप लँप, LED टेल लाइट्स, प्रोजेक्टर हेडलँप, LED DRLs, फॉग लँम्प, , शार्क फिन एंटीना आणि अन्य फीचर्स सामिल आहेत.

  सावधान! पुढे धोका आहे! Driving करताना हे Mobile app तुम्हाला करेल Alert

  7 लाखांपर्यंत असेल किंमत - Tata Tiago कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे, ज्याची दर महिन्याला जवळपास 6000 ते 8000 यूनिट्सची विक्री होते. CNG वेरिएंटनंतर कारच्या विक्रीत अधिक वाढ पाहायला मिळू शकते. Tata Tiago च्या सध्याच्या पेट्रोल वेरिएंटची किंमत 4.99 लाख ते 6.95 लाख रुपयांपर्यंत आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Car, Tata group

  पुढील बातम्या