कारमध्ये एकटे असल्यावर मास्क न वापरल्यास लागेल दंड? सरकारने दिला नवा आदेश

कारमध्ये एकटे असल्यावर मास्क न वापरल्यास लागेल दंड? सरकारने दिला नवा आदेश

प्रवासादरम्यान अनेक लोकं हे बस किंवा खासगी गाडीने एकत्र प्रवास करत असतात. अशा वेळी जर तुम्ही बसमधून प्रवास करत असाल आणि...

  • Share this:

नवी दिल्ली, 05 सप्टेंबर : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे मास्क वापरणे सर्वांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. पण, अशात जर कारमध्ये तुम्ही एकटेच प्रवास करत असाल आणि काचा बंद असतील तर मास्क वापरणे अनिवार्य आहे का? असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे.

दिल्ली पोलिसांनी कारमध्ये एकटे प्रवास करत असताना मास्क न वापरणाऱ्या चालकांना दंड ठोठावला आहे.  परंतु, आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, 'आम्ही असे कोणतेही आदेश दिले नाही, ज्यामध्ये कार चालवता एकटे असल्यावर मास्क वापरणे गरजेचं आहे.  जर तुम्ही इतर लोकांसोबत एकाच कारमधून प्रवास करत असाल तर मास्क वापरणे गरजेचं आहे.'

इमारतीचे सुरू होते बांधकाम, पहिल्या मजल्यावर महिलेला जे दिसले आणि....

प्रवासादरम्यान अनेक लोकं हे बस किंवा खासगी गाडीने एकत्र प्रवास करत असतात. अशा वेळी जर तुम्ही बसमधून प्रवास करत असाल आणि बसमध्ये जास्त लोकं असतील तर मास्क वापरणे हे बंधनकारक असणार आहे. तसंच सोशल डिस्टन्ससिंगचे नियमही पाळावे लागतील.

पण, जर तुम्ही स्वत:च्या कारमधून एकटेच प्रवास करता असाल तर तुम्हाला मास्क वापरणे बंधनकारक नसणार आहे. असाच प्रकार हा व्यायाम करताना आढळून आला आहे. लोकं एकांतात व्यायाम करत असतील तर हाच नियम तिथेही लागू असेल. पण, जास्त लोकं जसे, सायकलिंग करत असतील तर किंवा इतर व्यायाम करत असतील तर मास्क वापरणे अनिवार्य आहे. जर तुम्ही एकटेच सायकल चालवत असाल तर मास्क वापरणे अनिवार्य नाही.

BSNL मध्ये परिस्थिती बिकट, होणार 20000 कर्मचाऱ्यांची कपात

दिल्ली पोलिसांनी 15 जून ते 2 सप्टेंबर दरम्यान सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, थुंकणे आणि सोशल डिस्टन्ससिंग न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे. दीड लाखांपेक्षा जास्त लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे. या दरम्यान,  15 पोलीस स्टेशन अंतर्गत केलेल्या कारवाईत 2,60,991 दंड भरण्यात आला आहे. या दंडाची रक्कम ही तब्बल 13 कोटी इतकी जमा झाली आहे.

जनअदालत भरवून माओवाद्यांनी केले धक्कादायक कृत्य, पोलीस दल हादरले

ज्या लोकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरले नाही अशा लोकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.   एवढंच नाहीतर दिल्ली पोलिसांनी दंड वसूल केल्यानंतर 15 जून ते 2 सप्टेंबरपर्यंत एकूण 2,47,007 लोकांना मास्क वाटप केले आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, कारमध्ये एकटा असलेला व्यक्ती हा सार्वजनिक ठिकाणी आढळून आला आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती, असं एका वरिष्ठ पोलिसाने सांगितले.

Published by: sachin Salve
First published: September 5, 2020, 3:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading