जाहिरात
मराठी बातम्या / मनी / BSNL मध्ये परिस्थिती बिकट, होणार 20000 कर्मचाऱ्यांची कपात

BSNL मध्ये परिस्थिती बिकट, होणार 20000 कर्मचाऱ्यांची कपात

BSNL मध्ये परिस्थिती बिकट, होणार 20000 कर्मचाऱ्यांची कपात

गेल्या 14 महिन्यात पगार न झाल्यामुळे 13 कॉन्ट्रॅक्ट कामगारांनी आत्महत्या केली आहे. त्यानंतरही निश्चित करण्यात आलेल्या तारखेला मजुरांना पगार मिळत नाही आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 05 सप्टेंबर : सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लि. (Bharat Sanchar Nigam Limited) आणखी जवळपास 20000 कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांची (Contract Workers) कपात करणार आहे. बीएसएनएलच्या कर्मचारी युनियनने शुक्रवारी असा दावा केला आहे. यूनियनने असा देखील दावा केला आहे की, कंपनीने याआधी 30 हजार कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. या कर्मचाऱ्यांना गेल्या एका वर्षापासून अधिक काळापासून पगार दिला नाही आहे. यूनियनने असे म्हटले आहे की, व्हीआरएसनंतर (VRS) देखील बीएसएनएल कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देऊ शकत नाही आहे. बीएसएनएलचे चेअरमन आणि प्रबंध संचालक पी के पुरवार यांना लिहिलेल्या पत्रामध्ये यूनियनने असे म्हटले आहे की स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजनेनंतर (VRS) कंपनीची आर्थिक स्थिती आणखी खराब झाली आहे. विविध शहरांमध्ये कर्मचारी संख्या घटल्यामुळे नेटवर्क संदर्भातील तक्रारी वाढल्या आहेत. यूनियनने अशी माहिती दिली आहे की, बीएसएनएल व्हिआरएसनंतर त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेळेत पेमेंट देऊ शकत नाही आहे. यूनियनने असे म्हटले आहे की, गेल्या 14 महिन्यात पगार न झाल्यामुळे 13 कॉन्ट्रॅक्ट कामगारांनी आत्महत्या केली आहे. त्यानंतरही निश्चित करण्यात आलेल्या तारखेला मजुरांना पगार मिळत नाही आहे. बीएसएनएलला यासंदर्भात पाठवण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील मिळाली नाही आहेत. Post Office बचत खात्याच्या नियमात बदल, माहित नसल्यास होईल मोठे नुकसान

बीएसएनएलने 1 सप्टेंबर रोजी सर्व मुख्य सरव्यवस्थापकांना संचालक एचआरच्या परवानगीने एक आदेश जारी करून कंत्राटी कामगारांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी त्वरित पावले उचलण्यास सांगितले. या व्यतिरिक्त कंत्राटी कामगारांना कंत्राटदारांमार्फत कमी काम घेण्यास सांगितले. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी बीएसएनएलच्या प्रत्येक मंडळाने तातडीने कंत्राटी कामगारांकडून काम न घेण्याबाबत स्पष्ट रूपरेषा तयार करावी असे आदेशात म्हटले होते. व्हीआरएस योजनेनंतर परिस्थिती बिघडली ते म्हणतात की व्हीआरएस योजना - 2019 ची अंमलबजावणी झाल्यानंतर कंत्राटी कामगारांसोबत काम करणे अधिक आवश्यक झाले आहे. व्हीआरएसमार्फत सुमारे कायम 79,000 कर्मचाऱ्यांना घरी पाठवले आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कंत्राटी कामगारांकडून काम करवून घेतले जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात