जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / इमारतीचे सुरू होते बांधकाम, पहिल्या मजल्यावर महिलेला जे दिसले आणि....

इमारतीचे सुरू होते बांधकाम, पहिल्या मजल्यावर महिलेला जे दिसले आणि....

इमारतीचे सुरू होते बांधकाम, पहिल्या मजल्यावर महिलेला जे दिसले आणि....

नालासोपारा पूर्वेकडील एव्हर शाईन येथी मंगलमूर्ती हाईट प्रकल्प या बांधकाम सुरू आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नालासोपारा, 05 सप्टेंबर : नालासोपारा पूर्वेकडील एव्हर शाईन येथील मंगलमूर्ती हाईट प्रकल्प या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तळ मजल्यावर एका तरुणाची गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नालासोपारा पूर्वेकडील एव्हर शाईन येथी मंगलमूर्ती हाईट प्रकल्प या बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावरील पाण्याच्या टाकी जवळ नाझिया सय्यद नावाची महिला पाणी भरण्यासाठी इमारतीत गेली होती. तेव्हा तिला एक तरुण हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला होता. या तरुणाच्या गळ्यावर कुणी तरी तिक्ष्ण हत्याराने वार केला होता.  तिने तातडीने तिच्या मालकाला सांगून तुळींज पोलिसांना कळवले. नागमोडी वळणावर ओव्हरटेक करायला गेला आणि घात झाला, अपघाताचा LIVE VIDEO तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून चौकशी केली असता तो मयत इसम सद्दाम सय्यद असल्याचे कळाले. मयत सद्दाम सय्यद हा अलकापुरी येथे एका महिलेसोबत राहत होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. नालासोपारा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला आहे. जनअदालत भरवून माओवाद्यांनी केले धक्कादायक कृत्य, पोलीस दल हादरले पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला असून लवकरच त्याला अटक करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास तुळींज पोलीस करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात