नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : कोरोनानंतर खासगी वाहनांतून प्रवास करणाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे Four Wheeler खरेदी करण्याच्या संख्येत वाढ झाल्याचं चित्र आहे. सध्या Nissan Motors च्या गाड्या भारतीय बाजारात चर्चेचा विषय आहेत. कंपनीच्या मागील वर्षी लाँच झालेल्या SUV ची बाजारात जबरदस्त क्रेझ होती. लाँच झाल्यापासून आतापर्यंत 30000 हून अधिक ग्राहकांची या गाडीची खरेदी केली आहे.
जपानची पॉप्युलर कार कंपनी Nissan Motors ने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय बाजारात कंपनीने आपल्या Nissan Magnite चे आतापर्यंत 30000 यूनिट डिलीव्हर केले आहेत. कंपनीने मागील वर्षी डिसेंबरमध्ये ही सब-कॉप्मॅक्ट SUV लाँच केली होती. लाँचनंतर या कारची भारतीय बाजारात मोठी क्रेझ होती. त्याशिवाय कोरोनानंतर आर्थिक परिस्थिती काहीशी सुधारत असताना, या कारच्या मागणीत मोठी वाढ झाली. Nissan Magnite लाँच झाल्यापासून आतापर्यंत 1 वर्ष पूर्ण होण्याआधीच कंपनीला याच्या एकूण 72000 यूनिटच्या बुकिंग मिळाल्या आहेत.
Nissan Motors ने गेल्या वर्षी 5 सीटर Nissan Magnite लाँच केली होती. त्यावेळी या कारची सुरुवातीची किंमत 5 लाख रुपयांहून कमी होती. त्यानंतर या किमतीत बदल करण्यात आले. आता या कारची सुरुवातीची किमत 6 लाख रुपयांहून कमी आहे. Nissan Magnite 5.71 लाख रुपयांपासून ते 10.15 लाख रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे.
Nissan Magnite पेट्रोल इंजिनमध्ये येते. यात 1.0 लीटर टर्बो इंजिन असून ते 98 bhp मॅक्स पॉवर आणि 152 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. एक लीटर पेट्रोलमध्ये ही कार अधिकाधिक 20 किलोमीटर मायलेज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car