Home /News /auto-and-tech /

दमदार फीचर्ससह लाँच होणार Maruti Suzuki Brezza, पाहा काय असणार खास

दमदार फीचर्ससह लाँच होणार Maruti Suzuki Brezza, पाहा काय असणार खास

कंपनी ही SUV Vitara Brezza ऐवजी नव्या 2022 Maruti Brezza या नावाने लाँच करेल. या नव्या गाडीमध्ये अनेक नवे फीचर्स दिसतील. ही गाडी सध्याच्या Brezza च्या तुलनेत वेगळी असेल.

  नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : Maruti Suzuki आपल्या SUVs ची रेंज वाढवण्यासह सध्याच्या SUVs देखील अपडेट करणार आहे. याअंतर्गत कंपनी पुढील वर्षापासून न्यू जनरेशन Vitara Brezza लाँच करण्याच्या तयारीत आहे. मागील काही दिवसांत या अपकमिंग SUV चे काही फोटो समोर आले होते. एका रिपोर्टनुसार, कंपनी ही SUV Vitara Brezza ऐवजी नव्या 2022 Maruti Brezza या नावाने लाँच करेल. या नव्या गाडीमध्ये अनेक नवे फीचर्स दिसतील. ही गाडी सध्याच्या Brezza च्या तुलनेत वेगळी असेल. फॅक्टरी फिटेड सनरुफ - भारतीय ग्राहकांमध्ये सनरुफची क्रेझ असून याची मागणीही वाढती आहे. मारुतिने ग्राहकांची ही आवड लक्षात घेता, नव्या Brezza मध्ये इलेक्ट्रिक सनरुफ देण्याचा निर्णय घेतला आहे. हे कंपनीचं असं पहिलं मॉडेल असेल, जे फॅक्टरी फिटेड सनरुफसह येईल. टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टम - ब्रेजाच्या लीक फोटोमधून समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनीने यात फ्री स्टँडिंग, मोठा टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात येण्याची शक्यता आहे. कंपनी ब्रेजाच्या Zxi आणि Zxi+ वेरिएंट्समध्ये 7.0 इंची टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टम देत असून हे अँड्रॉइड ऑटो आणि वॉइस कमांड्स सपोर्टसह येतं. वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिविटी - नव्या ब्रेजामध्ये मिळणाऱ्या मोठ्या टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये अँड्रॉइड ऑटो आणि Apple कार प्लेचा सपोर्ट मिळेल. याच्या मदतीने फोन विना वायर सिस्टमला कनेक्ट करता येईल. हे फीचर ब्रेजाच्या टॉप वेरिएंटमध्ये ऑफर केलं जाण्याची शक्यता आहे.

  Maruti Suzuki ची मोठी घोषणा, डिझेल Car ची निर्मिती बंद करणार; वाचा काय आहे कारण

  वायरलेस चार्जिंग - वायरलेस चार्जिंग सपोर्ट करणारे स्मार्टफोन आल्याने ग्राहकांमध्ये कारमध्ये वायरलेस चार्जिंग फीचरची मागणी वाढली आहे. सध्या मार्केटमध्ये अनेक कार असून त्या कार्समध्ये हे फीचर ऑफर केलं जात आहे. मारुतिही यात सामिल होत असून नव्या ब्रेजामध्ये हे फीचर दिलं जाण्याची शक्यता आहे. 360 डिग्री कॅमेरा - 360 डिग्री कॅमेरा सुरक्षेच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरतो. यामुळे ड्रायव्हरला प्रत्येक ठिकाणी रियल टाइम व्ह्यू मिळतो. आता मारुति आपल्या नव्या ब्रेजामध्ये हे फीचर ऑफर करणार आहे. सेफ्टी फीचर्स - 2022 मारुति ब्रेजा अनेक स्टँडर्ड सेफ्टी फीचर्ससह लाँच केली जाईल. ब्रेजाच्या स्टँडर्ड वेरिएंटमध्ये ड्यूल फ्रंट एयरबॅग, रियर पार्किंग सेंसर, फ्रंट सीटबेल्ट्स प्रीटेन्शन्स, रिमोट कंट्रोल सेंट्रल लॉकिंग आणि Isofix चाइल्ड सीट माउंट्स ऑफर केले जातील.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Car, Maruti suzuki cars

  पुढील बातम्या