नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicle) खरेदी करण्यासाठी मोदी सरकार प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय (Ministry of Road Transport and Highways- MoRTH) ने विना प्री-फिटेड बॅटरी इलेक्ट्रिक वाहनावर रजिस्ट्रेशनला परवानगी दिली आहे.
यापुढे इलेक्ट्रिक दुचाकी (2 wheeler) आणि तीन चाकी (3 wheelers) वाहनावर विक्री आणि रजिस्टेशन विना बॅटरी होणार आहे. इलेक्ट्रिक वाहनामध्ये बॅटरीची किंमतही 30 ते 40 टक्के असते. त्यामुळे सरकारने ही किंमत आता वजा केली आहे.
नुसता धुरळा! आली नवी कोरी Mahindra Thar, सॉलिड लूक आणि फिचर्स तर...
मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना याबद्दल स्पष्ट आदेश दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये विना बॅटरी वाहनाचा विक्री करता येणार आहे. तसंच रजिस्ट्रेशन करत असताना मेक / टाइप किंवा बॅटरीची इतर माहिती देण्याची गरज नाही.
परंतु, इलेक्ट्रिक वाहनामध्ये बसवलेली बॅटरी किंवा ती काढून इतर ठिकाणी चार्ज करता येईल अशी बॅटरी केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989 च्या 126 नियमांनुसार योग्य प्रमाणावर चाचणी केलेली असावी आणि तशी त्यांची नोंद असावी.
मोदी सरकार देशात इलेक्ट्रिकल वाहनांच्या खरेदी आणि विक्रीची वाढ होण्यास प्रोत्साहन देत आहे. यामुळे वातावरणातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. यामुळे वाढत्या इंधन दरावर ही आळा घालता येईल.
'मला कोव्हिड सेंटरमध्ये करमत नाही,' रुसलेले कोरोनाबाधित महाराज थेट रस्त्यावर आले
इलेक्ट्रिकल दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या विक्रीला वाढ मिळावी म्हणून मंत्रालयाने वाहनातून बॅटरीची किंमत वेगळी करण्याची सूचना केली होती. त्यामुळे बॅटरीविना दुचाकी आणि तीनचाकी इलेक्ट्रिक वाहनांची बाजारात बिना बॅटरी विकता येणार आहे.