मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

फक्त 20 पैसे किमी येईल खर्च, भारतात आली सर्वात स्वस्त आणि मस्त बाइक!

फक्त 20 पैसे किमी येईल खर्च, भारतात आली सर्वात स्वस्त आणि मस्त बाइक!

Detel इंडियाने भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे. या मोपेडची किंमत फक्त 19,999 रुपये इतकीच आहे.

Detel इंडियाने भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे. या मोपेडची किंमत फक्त 19,999 रुपये इतकीच आहे.

Detel इंडियाने भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे. या मोपेडची किंमत फक्त 19,999 रुपये इतकीच आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 18 ऑगस्ट : कोरोनामुळे देशभरात गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे मंदीच्या या काळात स्वस्तात मस्त अशा गाड्यांची मागणी वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहनांना खास अशी मागणी आहे. त्यामुळे Detel इंडियाने भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाइक लाँच केली आहे.

Detel इंडियाने याधी LED टीव्ही लाँच केला होता. त्यानंतर आता इलेक्ट्रिक बाइक क्षेत्रात उडी घेत सर्वात स्वस्त आणि मस्त अशी बाइक/मोपेड आणली आहे. या मोपेडचा आकर्षक लूक आहे. या मोपेडची किंमत फक्त 19,999 रुपये (+GST) इतकाच आहे. कंपनीने दावा केला आहे, यात मोपेडवर प्रवास करत असताना तुम्हाला फक्त  20 पैसे प्रति किलोमीटर खर्च येईल.

Triumph वजनदार BS6 bonneville speedmaster भारतात लाँच, किंमत आणि फिचर्स

जर तुम्हाला ही  इलेक्ट्रिक मोपेड खरेदी करायची असेल तर याबद्दल कंपनीच्या अधिकृत वेबसाइट  b2badda.com वर संपूर्ण माहिती दिली आहे. तुम्ही ही मोपेड ऑनलाइन विकत घेऊ शकता. या जर तुम्हाला ही बाइक EMI वर घ्यायची असेल तर त्यासाठी Bajaj Finserv ने चांगला प्लॅन दिला आहे. या कंपनीने Bajaj Finserv सोबत नवीन ऑफर सुद्धा आणली आहे.  त्यामुळे ही बाइक EMI वर सुद्धा घेता येईल.

या मोपेडचे वैशिष्ट्य

नवी Detel Easy इलेक्ट्रिक मोपेड ही तीन रंगांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. यात जेट ब्लॅक, पर्ल व्हाइट आणि मॅटेलिक रेड रंग दिले आहे. काही वस्तू ठेवण्यासाठी बाइकमध्ये एक बास्केट दिली आहे. तसंच पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी सपोर्ट दिला आहे. एवढेच नाहीतर तुम्हाला उंचीनुसार, सीट कमी जास्तही करता येईल.

Facebook मध्ये दिसेल TikTok सारखे फीचर! शॉर्ट व्हिडीओ बनवण्याबाबत टेस्टिंग सुरू

Detel Easy या मोपेडमध्ये कंपनीने 250W  क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. यात 48V इतकी क्षमता  असून 12AH LiFePO4 बॅटरीचा वापर केला आहे. कंपनीने दावा केला आहे की, इलेक्ट्रिकल मोपेड एकदा फुल चार्ज केल्यावर 60 किलोमीटर इतका प्रवास करू शकते.

या मोपेडची बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्यासाठी  7 ते 8 तास इतका वेळ लागतो. या मोपेडचा टॉप स्पीड हा 25 किलोमीटर प्रतितास इतका आहे. या मोपेडसाठी लायसन्स आणि रजिस्ट्रेशन करण्याची कोणतीही गरज नाही.

First published: