नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर : Maruti Suzuki कंपनीने Celerio Car चं नवं मॉडेल लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर कंपनीनं ग्राहकांना बंपर ऑफर देत केवळ 11 हजार रूपयांना या कारच्या बुकिंगची सुविधाही उपलब्ध करून (Maruti Suzuki company has launched Celerio car with tremendous mileage) दिली आहे. आता Maruti Suzuki कंपनीच्या गाड्यांमध्ये Celerio ही अपडेटेड कार मानली जात आहे. त्याचबरोबर ही कार देशात सर्वाधिक (celerio car Booking can be done for only 11 thousand) मायलेज देणारी कार ठरणार असल्याचीही कंपनीचे माहिती कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी दिली आहे.
या कारविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, या कारला पेट्रोल इंजिन, स्टायलिश डिझाईन आणि सेगमेंट-फर्स्ट सारख्या फीचर्समुळं ही कार ऑलरॉऊंडर ठरणार आहे. त्याचबरोबर कंपनीचे चीफ टेक्नीकल ऑफिसर सीवी रमन यांनी याविषयी बोलताना म्हटलंय, ड्युअल VVT इंजिन आणि सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच आयडल स्टार्ट-स्टॉप टेक्नोलॉजीसोबत ही कार देशातील सर्वात जास्त मायलेज देणारी कार ठरणार आहे.
काय असतील फीचर्स?
मारुति सुझुकी कंपनीने या अपडेटेड सिलेरियो कारमध्ये ड्युअल-जेट, ड्युअल VVT, आयडल स्टार्ट-स्टॉप टेक्नोल़जी आणि आकर्षक डिझाइनची सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर या कारमध्ये ग्राहकांसाठी सुरक्षा आणि कंफर्टचीही काळजी घेण्यात आली आहे. चांगल्या फीचर्ससह ही कार खरेदी करण्याची संधी आहे. केवळ 11 हजार भरून ही कार ग्राहकांना खरेदी करता येणार असल्याची माहिती आहे.
मारुति सुझुकी एरिनाच्या वेबसाइट www.marutisuzuki.com/celerio वर लॉगइन करुन ही कार बुक करता येईल. तसंच जवळच्या मारुति सुझुकी शोरुममध्येही संपर्क करुन कार बुक करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Maruti suzuki cars