Home /News /auto-and-tech /

देशातील सर्वात स्वस्त कार वेरिएंट, जबरदस्त फीचर्ससह मिळेल 22 किमीपर्यंतच मायलेज

देशातील सर्वात स्वस्त कार वेरिएंट, जबरदस्त फीचर्ससह मिळेल 22 किमीपर्यंतच मायलेज

2021 च्या सुरुवातीपासून अधिकतर वाहन निर्माता कंपन्यांनी आपल्या कार्सच्या किमतीत वाढ केली आहे, त्यामुळे आता मारुती ऑल्टो भारतात विक्री होणाऱ्या सर्वात स्वस्त कारमध्ये सामिल आहे.

  नवी दिल्ली, 18 जून : भारतीय बाजारात परवडणाऱ्या हॅचबॅक कार्सची डिमांड नेहमीच असते. छोट्या हॅचबॅक कार्समध्ये चांगलं मायलेज, कमी किमत आणि लो मेंटनेंसमुळे भारतीय बाजारात अनेकांची अशा कार्सला पसंती असते. ऑल्टो कारची (Alto Car) या सेगमेंटमध्ये नेहमीच मोठी मागणी राहिली आहे. 2021 च्या सुरुवातीपासून अधिकतर वाहन निर्माता कंपन्यांनी आपल्या कार्सच्या किमतीत वाढ केली आहे, त्यामुळे आता मारुती ऑल्टो भारतात विक्री होणाऱ्या सर्वात स्वस्त कारमध्ये सामिल आहे. कंपनीने या कारचे एकूण 6 वेरिएंट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. या कारच्या बेस मॉडेलची किंमत 2.99 लाख रुपये आहे. तर कारच्या टॉप वेरिएंट VXi प्लसची किंमत 4.60 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनीने आपल्या या कारमध्ये 796cc क्षमतेच्या पेट्रोल इंजिनचा वापर केला आहे, जो 60Nm टॉर्क आणि 40.3bhp पॉवर जनरेट करतो. या कार्सच्या सर्व वेरिएंटमध्ये एकाच प्रकारच्या इंजिनचा वापर केला गेला आहे. या सर्व कार वेरिएंटचं मायलेज जवळपास 22 किलोमीटर प्रति लीटर आहे. मारुती ऑल्टो स्टँडर्ड वेरिएंट - स्टँडर्ड सेफ्टी फीचर्ससह या कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन, रिवर्स पार्किंग सेंसर, स्पीड अलर्ट सिस्टम, हाय माउंटेड स्टॉप लँप, इमोबिलायजर, फ्रंट वायपर आणि वॉशर, ड्रायव्हर साईड एअरबॅग आणि हेडलाईट लेवलिंग असे फीचर्स मिळतात. या कारच्या स्टँडर्ड वेरिएंटची किंमत 2.99 लाख रुपये आहे. तर याच्या स्टँडर्ड ऑप्शनल वेरिएंटची किंमत 3.4 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

  (वाचा - पेट्रोल-डिझेल विसरा, आता येणार हायड्रोजनवर चालणारी Car)

  मारुती ऑल्टो LXi - मारुतीच्या या कारमध्ये स्टँडर्ड वेरिएंटमध्ये मिळणाऱ्या फीचर्ससह फुल व्हिल कवर्स, बॉडी कलर्ड बंपर आणि डोर हँडल देण्यात आले आहेत. फ्रंट पॉवर विंडो, इंटिग्रेटेड सीट हेडरेस्ट, रिमोट बूट लिड ओपनर, चाईल्ड लॉक, ELR सीट बेल्ट्स सारखे फीचर्स सामिल आहेत. या कारची किंमत 3.76 लाख रुपये आहे. तर कारच्या ऑप्शनल वेरिएंटची किंमत 3.80 लाख रुपये आहे. याच्या ऑप्शनल वेरिएंटमध्ये ड्रायव्हर साईड एअरबॅगही आहे.

  (वाचा - Royal Enfield लाँच करणार 5 नव्या बाईक, जाणून घ्या काय असणार खास)

  मारुती ऑल्टो VXi - या कारमध्ये LXi वेरिएंटशिवाय रियर व्ह्यू मिरर, सेंटर डोर लॉक, किलेस एन्ट्री, अॅक्सेसरी सॉकेट, ऑडिओ सिस्टम, USB आणि ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी, 2 फ्रंट स्पीकरसारखे फीचर्स आहेत. मारुती VXi ची किंमत 4.16 लाख रुपये आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Maruti suzuki cars

  पुढील बातम्या