नवी दिल्ली, 17 जून : पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या असताना देशात आता सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर (Electric Vehicle) जोर देत आहे. अशातच आता अशी कार लाँच होणार आहे, जी हायड्रोजनवर (Hydrogen) चालेल. ही कार पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीपासून सुटका करेल, तसंच कोणत्याही वातावरणात सुसाट धावेल असं सांगण्यात आलं आहे.
Jaguar Land Rover ने दिलेल्या माहितीनुसार, ते एका हायड्रोजन फ्यूल सेल इलेक्ट्रिक व्हिकलवर काम करत आहे. ही कार Land Rover Defender एसयूवीवर बेस्ड आहे. FCEV मध्ये (Fuel Cell Electric Vehicle) हायड्रोजनने इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते, जी कारमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक मोटरला पॉवर देते. हा बॅटरीने चालणाऱ्या इलेक्ट्रिक व्हिकलचा एक पर्याय आहे. 'zero emission' बनवण्याच्या दिशेने हे एक मोठं पाउल आहे.
FCEV कमी तापमानच्या रेंजची कमी पूर्ण करतो. अशात याची हाय एनर्जी डेंसिटी आणि वेगात रिफ्लूलिंग होण्याच्या क्षमतेमुळे ही अधिक गरम किंवा थंड प्रदेशात चालणाऱ्या गाड्यांसाठी चांगली टेक्नोलॉजी आहे. तसंच हे मोठ्या वाहनांसाठीदेखील योग्य आहे.
Jaguar Land Rover ने आपल्या हायड्रोजन व्हिकलची टेस्टिंग याच वर्षी सुरू करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. कंपनीचे हायड्रोजन अँड फ्यूल सेलचे प्रमुख राल्फ क्लाग यांनी सांगितलं, की भविष्यात बॅटरी व्हिकलसह हायड्रोजनदेखील ऑटो इंडस्ट्रीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
Published by:Karishma Bhurke
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.