मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Mahindra च्या या Cars वर बंपर डिस्काउंट, 81,500 रुपयांपर्यंत मिळेल ऑफर

Mahindra च्या या Cars वर बंपर डिस्काउंट, 81,500 रुपयांपर्यंत मिळेल ऑफर

Mahindra and Mahindra अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, SUV वर 81,500 रुपयांपर्यंतचा बेनिफिट दिला जात आहे. या बेनिफिट्समध्ये रोख सूट, एक्सचेंज ऑफर, कॉर्पोरेट सूट आणि एक्स्ट्रा ऑफर सामिल आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 9 डिसेंबर : तुम्ही नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी डिस्काउंट, ऑफर्ससह चांगली संधी आहे. Mahindra and Mahindra ने इन्वेंट्री खाली करण्यासाठी डिसेंबर 2021 महिन्यासाठी काही निवडक मॉडेलवर बेनिफिट्स दिले आहेत. अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, SUV वर 81,500 रुपयांपर्यंतचा बेनिफिट दिला जात आहे. या बेनिफिट्समध्ये रोख सूट, एक्सचेंज ऑफर, कॉर्पोरेट सूट आणि एक्स्ट्रा ऑफर सामिल आहे.

महिंद्राच्या काही निवडक एसयूवीवर 31 डिसेंबर 2021 पर्यंत ऑफर वॅलिड आहे. Mahindra Thar, Bolero Neo आणि XUV700 वर कोणताही डिस्काउंट नाही.

Mahindra Alturas SUV 81,500 रुपयांपर्यंतच्या बेनिफिट्ससह उपलब्ध आहे. या ऑफरमध्ये 50000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस, 11,500 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट ऑफर आणि 20000 रुपयांपर्यंत इतर ऑफर्स आहेत.

दिसायला भारी पण Safety मध्ये Zero; या Car खरेदी करण्याआधी एकदा विचार कराच

Mahindra Scorpio -

महिंद्रा स्कॉर्पियो खरेदी करायची असल्यास, 34000 रुपयांचा बेनिफिट मिळेल. यात एक्सचेंज ऑफर 15000 रुपये, कॉर्पोरेट ऑफर 4,000 रुपये आणि इतर ऑफर 15000 रुपयांपर्यंत सामिल आहेत.

Mahindra XUV300 -

XUV300 सबकॉम्पॅक्ट SUV वर 69,002 रुपयांपर्यंतची ऑफर आहे. यात 30,002 रुपये कॅश ऑफर, 25000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 4500 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट सामिल आहे. ग्राहक सबकॉम्पॅक्ट SUV वर 10000 रुपयांपर्यंत इतर ऑफर मिळवू शकतात.

Mahindra KUV100 NXT -

Mahindra KUV100 NXT वर एकूण 61,055 रुपयांचा बेनिफिट मिळतो आहे. यात 38,055 रुपये रोख सूटसह 20,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि 4000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट सामिल आहे.

23हजार रुपयांत मिळतेय Honda Activa Scooter,चांगल्या मायलेजसह मिळतील जबरदस्त फीचर

Mahindra Bolero -

Mahindra Bolero 13000 रुपयांच्या सूटसह खरेदी करता येईल. यात 10000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि 3000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट ऑफर सामिल आहे.

Mahindra Marazzo -

Mahindra Marazzo वर 40,200 रुपयांचा बेनिफिट मिळतो आहे. 20000 रुपये रोख सूट, 15000 रुपये एक्सचेंज ऑफर आणि 5200 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट मिळतो आहे.

First published:

Tags: Car, Tech Mahindra