Home /News /auto-and-tech /

दिसायला भारी पण Safety मध्ये Zero; या Car खरेदी करण्याआधी एकदा विचार कराच

दिसायला भारी पण Safety मध्ये Zero; या Car खरेदी करण्याआधी एकदा विचार कराच

कार खरेदी करण्याआधी मार्केटमध्ये सुरक्षित कार्सबाबत माहिती करुन घेणं, सेफ्टी रेटिंग तपासणं गरजेचं आहे. सेफ्टी रेटिंग एजेन्सी ग्लोबल एनसीएपीकडून (Global NCAP) भारतातील असुरक्षित कारचं रेटिंग देण्यात आलं आहे.

  नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : कार खरेदी करताना किंमत, फीचर्ससह सर्वात मोठी प्राथमिकता कारच्या सुरक्षेबाबत असते. जर तुम्ही करा खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सेफ्टी लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. कार्सचं अतिशय मोठं मार्केट आहे. यात हजारोंनी कार मॉडेल आहेत. परंतु त्यात सुरक्षित कार निवडणं गरजेचं आहे. कार खरेदी करण्याआधी मार्केटमध्ये सुरक्षित कार्सबाबत माहिती करुन घेणं, सेफ्टी रेटिंग तपासणं गरजेचं आहे. सेफ्टी रेटिंग एजेन्सी ग्लोबल एनसीएपीकडून (Global NCAP) भारतातील असुरक्षित कारचं रेटिंग देण्यात आलं आहे. Maruti Suzuki Eeco - ग्लोबल एनसीएपीने मारुति इकोचे 2016 मध्ये क्रॅश टेस्टिंगची तथ्यं प्रकाशित करण्यात आली होती. त्यानुसार, या कारला सेफ्टीमध्ये झिरो रेटिंग देण्यात आलं होतं. ही 5 डोर मिनी वॅन आहे. या कारची किंमत 4,38,000 रुपये आहे.

  काय सांगता! सांडपाणी अन् कचऱ्यापासून कारची इंधननिर्मिती! नितीन गडकरींची माहिती

  Datsun Go - Datsun ब्रँडची Datsun Go अतिशय असुरक्षित कार कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आली आहे. ग्लोबल एनसीएपीने या कारला क्रॅश टेस्टिंगमध्ये झिरो रेटिंग दिलं आहे. क्रॅश टेस्टवेळी कारमध्ये एयरबॅग नव्हते. 2014 मध्ये या कारचं टेस्टिंग प्रकाशित करण्यात आलं होतं. Renault KWID - रेनॉची छोटी कार क्विड सेफ्टी प्रकरणात योग्यतेची ठरली नाही. ग्लोबल एनसीएपीने या कारलाही झिरो रेटिंग दिलं आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत 4,11,500 रुपये आहे. 2016 मध्ये केलेल्या टेस्टवेळी कारला एयरबॅग नव्हते.

  30 रुपयांत 185 किमी! इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने तयार केली इलेक्ट्रिक कार

  Maruti Suzuki S-Presso - ग्लोबल एनसीएपीने या कारला असुरक्षित म्हटलं आहे. क्रॅश टेस्टिंगमध्ये सेफ्टी रेटिंग एजेन्सीने कारला झिरो रेटिंग दिले आहेत. 2020 मध्ये कंपनीने याबाबत माहिती दिली. या कारला 5 डोर मिनी एसयूव्ही म्हटलं जातं. ग्लोबल एनसीएपीने ज्यावेळी या कारचं टेस्टिंग केलं, त्यावेळी कारमध्ये ड्रायव्हर एयरबॅगदेखील होते. Maruti Suzuki Alto - मारुति सुझुकीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये सामिल मारुति ऑल्टोला ग्लोबल एनसीएपीने झिरो रेटिंग दिलं आहे. क्रॅश टेस्ट रिपोर्ट 2014 मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. त्यावेळी कारमध्ये एयरबॅग नव्हते. सध्या या कारची सुरुवातीची किंमत 3,15,000 रुपये आहे.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या