मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /Mahindra च्या कार्सवर मिळतोय 81000 रुपयांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, पाहा कधीपर्यंत घेता येईल फायद

Mahindra च्या कार्सवर मिळतोय 81000 रुपयांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, पाहा कधीपर्यंत घेता येईल फायद

जर तुम्हीही महिंद्रा कंपनीची गाडी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्याकडे 30 नोव्हेंबरपर्यंत डिस्काउंट ऑफरचा फायदा घेण्याची संधी आहे.

जर तुम्हीही महिंद्रा कंपनीची गाडी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्याकडे 30 नोव्हेंबरपर्यंत डिस्काउंट ऑफरचा फायदा घेण्याची संधी आहे.

जर तुम्हीही महिंद्रा कंपनीची गाडी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्याकडे 30 नोव्हेंबरपर्यंत डिस्काउंट ऑफरचा फायदा घेण्याची संधी आहे.

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra) आपल्या कार्सवर बंपर डिस्काउंट देत आहे. जर तुम्हीही महिंद्रा कंपनीची गाडी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्याकडे 30 नोव्हेंबरपर्यंत डिस्काउंट ऑफरचा फायदा घेण्याची संधी आहे. ग्राहकांना कार्सवर 81,500 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळतो आहे.

डिस्काउंटमध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बेनिफिट्स, कॉर्पोरेट सूट सारख्या ऑफर्स दिल्या जात आहेत.

Mahindra KUV100 NXT -

KUV100 NXT एसयूवीवर एकूण 61,055 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळतो आहे. यात 38,055 रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट, 20 हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट ऑफर दिली जात आहे.

Mahindra Scorpio -

महिंद्रा स्कॉर्पियो एसयूवीवर 32,320 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळतो आहे. Scorpio वर 15 हजारांपर्यंतचा एक्सचेंज बेनिफिट, 4 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट ऑफर आणि 13,320 रुपयांपर्यंत एक्स्ट्रा डिस्काउंट सामिल आहे.

लवकरच लॉन्च होणार येणार Apple कंपनीची इलेक्ट्रिक कार; पाहा फीचर्स

Mahindra Alturas G4 -

महिंद्रा Alturas G4 SUV वर 81,500 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळतो आहे. यात 50,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 11,500 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट ऑफर आणि 20,000 रुपयांपर्यंत एक्स्ट्रा ऑफर आहे.

Mahindra XUV300 -

महिंद्राच्या XUV300 सबकॉम्पॅक्ट SUV वर 49,000 रुपयांपर्यंतची सूट मिळते आहे. यात 15,000 रुपयांपर्यंतची कॅश ऑफर, 25000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 4500 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 5000 रुपयांपर्यंतची एक्स्ट्रा ऑफर आहे.

Bounce Infinity: आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर 2 डिसेंबरला लॉन्च होणार

Mahindra Marazzo -

Mahindra Marazzo MPV वर 40,200 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट ऑफर केला जात आहे.

Mahindra Bolero -

महिंद्रा बोलेरो एसयूवीवर 13 हजारांचा डिस्काउंट मिळतो आहे. त्याशिवाय 10 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज ऑफर आणि 3 हजार रुपयांपर्यंतची कॉर्पोरेट ऑफर दिली जात आहे.

First published:

Tags: Tech Mahindra