मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

क्या बात है! लवकरच लॉन्च होणार Apple कंपनीची इलेक्ट्रिक कार; पाहा काय असतील फीचर्स

क्या बात है! लवकरच लॉन्च होणार Apple कंपनीची इलेक्ट्रिक कार; पाहा काय असतील फीचर्स

ब्लूमबर्गने जारी केलेल्या एका रिपोर्टनुसार अ‍ॅपलने इलेक्ट्रिक कार बनवण्याचा निर्णय घेतल्यापासून iPhone मेकर्सच्या शेयर्समध्ये 3 टक्क्यांची वाढ झाली आहे.

ब्लूमबर्गने जारी केलेल्या एका रिपोर्टनुसार अ‍ॅपलने इलेक्ट्रिक कार बनवण्याचा निर्णय घेतल्यापासून iPhone मेकर्सच्या शेयर्समध्ये 3 टक्क्यांची वाढ झाली आहे.

ब्लूमबर्गने जारी केलेल्या एका रिपोर्टनुसार अ‍ॅपलने इलेक्ट्रिक कार बनवण्याचा निर्णय घेतल्यापासून iPhone मेकर्सच्या शेयर्समध्ये 3 टक्क्यांची वाढ झाली आहे.

  • Published by:  Atik Shaikh
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी अ‍ॅपलने (Apple electric car) इलेक्ट्रिक कार तयार करण्याची तयारी सुरु केली आहे. सध्या भारतीय मार्केटमध्ये विविध कंपन्या इलेक्ट्रिक वाहनं लॉन्च करत असताना आता अ‍ॅपलच्या या कारची फारच (Apples Electric Car launch date) चर्चा होत आहे. ब्लूमबर्गने जारी केलेल्या एका रिपोर्टनुसार अ‍ॅपलने इलेक्ट्रिक कार बनवण्याचा निर्णय घेतल्यापासून iPhone मेकर्सच्या शेयर्समध्ये 3 टक्क्यांची वाढ झाली आहे. रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार अ‍ॅपलच्या इलेक्ट्रिक कारमध्ये (Apple electric car features) स्टीयरिंग व्हील आणि पॅडल नसतील. या कारला हँड्स-ऑफ ड्रायविंग च्या रूपात डिझाईन करण्यात आलं आहे. या प्रोजेक्टवर कंपनीद्वारे 2014 पासून काम केलं जात असून आता त्यांचं हे काम लवकरच पूर्ण होणार आहे.

Instagram व्हिडिओ मोबाईल किंवा डेस्कटॉपवर डाऊनलोड करायचेत? इथं क्लिक करा

इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत होतेय वाढ... सध्या भारतासह जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची फार क्रेझ पाहायला मिळत आहे. कारण ग्राहक सध्याच्या काळातील बिघडत्या समतोलामुळं चांगलेच जागरूक झालेले आहेत. त्यामुळं ही मागणी वाढत असल्याचं बोललं जात आहे. Tesla आणि Revian यांसारख्या कंपन्यांचे मार्केट प्राइज वाढताना दिसत आहे. 2025 पर्यंत लॉन्च होऊ शकते अ‍ॅपलची इलेक्ट्रिक कार Wesbush चे Analyst डॅन इवेस यांनी याविषयी बोलताना सांगितलं की 2025 सालापर्यंत अ‍ॅपल कंपनी Standalone या कारचं काम 60 ते 65 टक्क्यांपर्यंत काम पूर्ण करेल. त्याचबरोबर ब्लूमबर्गच्याही रिपोर्टमध्ये या कारच्या प्रोग्रेसबद्दल काही लोकांना शंका होती असा दावा करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्यानं कारमध्ये देण्यात आलेल्या इनबिल्ट Auto-driving system, प्रोसेसर चिप आणि Advanced sensor देण्यात आलेला होता. परंतु याविषयी कंपनीनं अजून स्पष्टीकरण दिलेलं नाही.

OnePlus पासून Galaxy Buds Pro पर्यंत, स्वस्तात मिळवा हे Ear Buds; आज शेवटची संधी

त्याचबरोबर रॉयटर्सनेही याविषयी माहिती देताना म्हटलं होतं की Apple एक Passenger Vehicle बनवण्याच्या तयारीत (Apple Passenger Vehicle) असून ज्यात (Apple battery technology) बॅटरी टेक्नॉलॉजी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अन्य मीडिया रिपोर्टनुसार Apple कंपनी 1 फेब्रुवारीपासून सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे.

आता प्रत्यक्षात येतेय हवेत उडणारी कार, भारतीय तंत्रज्ञाचाही हातभार

त्याचबरोबर प्रत्येक कर्मचाऱ्याला वर्षातील एक महिना घरापासून दुसऱ्या शहरामध्ये काम करावं लागेल, अशीही माहिती माध्यमांना मिळाली होती. त्यामुळं आता Apple कंपनीच्या भविष्यातील प्लॅनविषयी कल्पना करता येते.
First published:

Tags: Apple, Electric vehicles, Electricity, Technology

पुढील बातम्या