मुंबई, 21 नोव्हेंबर : देशात लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) लॉन्च होणार आहे. भाड्याने स्कूटर देणारी स्टार्टअप बाऊन्स आपली पहिली कंन्झुमर इलेक्ट्रिक स्कूटर Bounce Infinity पुढील महिन्यात म्हणजे 2 डिसेंबर रोजी देशांतर्गत बाजारात लॉन्च केली जाईल. या इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी 2022 च्या सुरुवातीला सुरू होण्याची अपेक्षा आहे. बंगळुरू येथून व्यवसाय चालवणाऱ्या कंपनीने यापूर्वी '22 मोटर्स' विकत घेतली.
बुकिंग 2 डिसेंबरपासून सुरू
बाऊंस कंपनीने या महिन्यात पुढील 12 महिन्यांत त्यांच्या ई-स्कूटर उत्पादन आणि बॅटरी स्वॅपिंग पायाभूत सुविधांमध्ये 10 कोटी डॉलर्सच्या गुंतवणूकीची घोषणा केली आहे. बाऊन्सने रविवारी एका निवेदनात सांगितले की, त्यांची कन्झुमर इलेक्ट्रिक स्कूटर 'इन्फिनिटी' 2 डिसेंबर रोजी देशांतर्गत बाजारात लॉन्च केली जाईल आणि त्याच दिवसापासून बुकिंग (Booking for Bounce Infinity Scooter) देखील सुरू होईल. केवळ 499 रुपयांच्या अॅडव्हान्ससह ही स्कूटर बूक करता येणार आहे.
iOS नंतर आता अँड्रॉइड युजर्ससाठी खूशखबर! Twitter वर मिळेल पैसे कमावण्याची संधी
बाऊंन्स इन्फिनीटीमध्ये उत्तम आणि काढता येणारी ली-आयन बॅटरी आहे. ग्राहक त्यांच्या सोय आणि गरजेप्रमाणे गाडीतून बॅटरी काढून घेऊन तीचे चार्जिंग (Bounce Infinity electric scooter with removable battery) करू शकतात. या जोडीला, बाऊंन्स तर्फे वैशिष्ट्यपूर्ण ‘बॅटरी अॅज अ सर्व्हिस’ हा पर्यायही देण्यात येत आहे. भारतीय बाजारपेठेत हे प्रथमच होत आहे. यामध्ये ग्राहकांना एकदम वाजवी किंमतीत बॅटरी शिवाय बाऊंन्स इन्फिनीटी खरेदी करण्याचा आणि बाऊंन्स बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क त्याऐवजी वापरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. ग्राहकांनी बॅटरी स्वॅप्ससाठी पैसे भरले की बाऊंन्स स्वॅपिंग नेटवर्कमधून रिकाम्या बॅटरीच्या बदल्यात संपूर्णपणे चार्ज झालेली बॅटरी ते घेऊ शकणार. यामुळे पारंपरिक स्कूटर्सच्या तुलनेत या स्कूटरची प्रवाही किंमत 40 टक्क्यापर्यंत खाली उतरते.
बाईकला चार्ज करताना प्रॉब्लेम येतोय? या टिप्स वापरा, होईल झटपट स्टार्ट
बाऊंन्सने 2021 मध्ये 22 मोटर्समध्ये 100 टक्के वाटा मिळवला असून या कराराचे मूल्य 7 दशलक्ष अमेरिकन डॉलर आहे. 22 मोटर्सशी झालेल्या कराराचा भाग म्हणून बाऊंन्सने राजस्थानमधील भिवडी येथील उत्पादन केंद्र यांच्यावर ताबा मिळवला आहे. या अत्याधुनिक केंद्राची दरवर्षी 1,80,000 स्कूटर्स उत्पादन करण्याची क्षमता आहे. भारतीय बाजारपेठेची क्षमता लक्षात घेऊन, कंपनी दक्षिण भारतात आणखी एक उत्पादन केंद्र उभारण्याची योजना आखत आहे. पुढील एका वर्षात इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात 100 दशलक्ष अमेरिकी डॉलर गुंतवण्यासाठी बाऊंन्सने बाजूला ठेवले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Electric vehicles, Scooter ride