मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

OMG! डिसेंबरपर्यंत कार खरेदीवर Renault देत आहे 80 हजारांपर्यंत सूट, या मॉडेल्सवर आहे ऑफर

OMG! डिसेंबरपर्यंत कार खरेदीवर Renault देत आहे 80 हजारांपर्यंत सूट, या मॉडेल्सवर आहे ऑफर

वर्षअखेर गाडी खरदीचा विचार जर तुम्ही करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. Renault त्यांच्या भारतातील काही गाड्यांवर धमाकेदार ऑफर देत आहे

वर्षअखेर गाडी खरदीचा विचार जर तुम्ही करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. Renault त्यांच्या भारतातील काही गाड्यांवर धमाकेदार ऑफर देत आहे

वर्षअखेर गाडी खरदीचा विचार जर तुम्ही करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. Renault त्यांच्या भारतातील काही गाड्यांवर धमाकेदार ऑफर देत आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 10 डिसेंबर: वर्षअखेर गाडी खरदीचा विचार जर तुम्ही करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. Renault च्या भारतातील काही डीलरशीप्सनी ग्राहकांसाठी कार खरेदीवर रोख, एक्स्चेंज बोनस आणि कार्पोरेट डिस्काउंट अशा स्वरूपात 80 हजार रुपयांपर्यंत घसघशीत सवलत जाहीर केली आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत कार खरेदी करणारे ग्राहक या सवलतींचा फायदा घेऊ शकतात. वेगवेगळ्या कारवरील सवलतही वेगळी आहे.

कारवाले (Carwale) या ऑनलाईन कार खरेदी विक्री सेवा देणाऱ्या कंपनीने कोणत्या कारवर किती सवलत आहे, याची माहिती दिली आहे.

Renault Duster:

कारच्या RXZ CVT, RXS आणि RXZ या मॉडेल्सवर वेगवेगळं डिस्काउंट देण्यात आलं आहे. CVT व्हेरिएंटवर रोख 20 हजार, एक्सचेंज बोनस 30 हजार आणि कार्पोरेट डिस्काउंट 30 हजार अशी 80 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळणार आहे.  तर डस्टरच्या RXS आणि RXZ मॉडेल्सवर एक्सचेंज बोनस 30 हजार रुपये आणि कार्पोरेट डिस्काऊंट 30 हजार रुपये अशी सवलत देण्यात येत आहे. टर्बो पेट्रोल आणि नॉन ऑटोमॅटिक पेट्रोल व्हेरिएंटवर ही सवलत मिळणार आहे.

Renault Kwid:

या कारवर रोख 15 हजार, एक्सचेंज बोनस 15 हजार आणि 9 हजार रुपयांपर्यंत कार्पोरेट डिस्काऊंट अशी सवलत मिळणार आहे. क्विड RXL मॉडेलवर अतिरिक्त 5 हजार रुपये रोख सवलत मिळणार आहे.

Renault Triber:

या कारवर रोख 10 हजार रुपये, एक्सचेंज बोनस 20 हजार रुपये आणि कार्पोरेट डिस्काऊंट 10 हजार रुपये अशी सवलत मिळणार आहे. AMT मॉडेलवर अतिरिक्त 10 हजार रुपये रोख सवलत देण्यात येणार आहे.

(हे वाचा-Gold Price Today: सोन्याचांदीची झळाळी उतरली, दागिने खरेदीआधी तपासा बुधवारचे दर)

लहान, मध्यम आणि एसयूव्ही अशा तिन्ही विभागांतील कार्स कंपनीकडे आहेत. त्यामुळे ग्राहकांना आपल्या आवडीची कार तीही सवलतीच्या दरात घेण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. कंपनीने नुकताच दिव्यांग लोकांसाठीही आपल्या ठराविक कार्सच्या खरेदीवर जीएसटी सवलतीसह विशेष कार्पोरेट डिस्काउंटही जाहीर केला आहे.

(हे वाचा-जगातल्या 100 बलशाली स्त्रियांची यादी जाहीर; निर्मला सीतारामन यांच्यासह 4 भारतीय)

कोरोना साथीमुळे अडचणीत आलेल्या वाहन उद्योगाला (Auto Sector) आता सणासुदीच्या काळामुळे दिलासा मिळाला आहे. वाहन खरेदीला चालना मिळाली असून, वर्षाअखेरीस विक्री वाढावी या दृष्टीने वाहन कंपन्या विविध आकर्षक सवलती जाहीर करत आहेत. रेनॉ इंडियानेही आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी सवलतींचा वर्षाव केला आहे. यामुळे कार विक्रीत चांगली वाढ होईल, असा कंपनीला विश्वास वाटतो.

First published:

Tags: Car, Money