जाहिरात
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / 1.50 लाख रुपयांत खरेदी करा Maruti आणि Honda कार, मिळेल 7 दिवसांचं फ्री ट्रायल

1.50 लाख रुपयांत खरेदी करा Maruti आणि Honda कार, मिळेल 7 दिवसांचं फ्री ट्रायल

1.50 लाख रुपयांत खरेदी करा Maruti आणि Honda कार, मिळेल 7 दिवसांचं फ्री ट्रायल

कोरोना महामारी आणि महागाईमुळे कार घेण्याच्या विचारात असणाऱ्यांचं बजेट आता कोलमडलं आहे. या परिस्थितीत अनेकांचं कार घेण्याचं स्वप्नही महागलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 जून : आपली स्वत:ची कार खरेदी करणं अनेकांचं स्वप्न असतं. परंतु कोरोना महामारी आणि महागाईमुळे कार घेण्याच्या विचारात असणाऱ्यांचं बजेट आता कोलमडलं आहे. या परिस्थितीत अनेकांचं कार घेण्याचं स्वप्नही महागलं आहे. कोरोनामुळे रोजगारासह उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे महागाईही वाढली आहे. परंतु नवी कार घेण्याऐवजी तुम्ही सेकंड हँड कारचा पर्यायही निवडू शकता. अशाच मारुती आणि होंडा सेडान कार आहेत, ज्याची किंमत केवळ 1.50 लाख रुपये आहे. आणि याच्या चाचणीसाठी तुम्हाला 7 दिवसांच्या ट्रायलचीही सुविधा मिळेल.

(वाचा -  देशातील सर्वात स्वस्त कार वेरिएंट, जबरदस्त फीचर्ससह मिळेल 22 किमीपर्यंतच मायलेज )

Honda City ZX GXI - Cars24 वेबसाईटवर लिस्ट असलेली ही कार 2007 चं मॉडेल आहे. जर तुम्ही या सेडान कारची खरेदी करू इच्छित असाल, तर तुम्हाला यासाठी केवळ 1 लाख 38 हजार 499 रुपये द्यावे लागतील. ही कार एकूण 1,55,004 किमीपर्यंत चालली आहे. तुम्ही जर ही कार खरेदी केली तर या कारचे तुम्ही सेकंड हँड ओनर असाल. यात पेट्रोल इंजिन मिळेल आणि ट्रान्समिशन मॅन्युअल मिळेल.

(वाचा -  सेकंड हँड कार खरेदी करताय? RC मध्ये हा पॉईंट तपासाच; अन्यथा येईल मोठी समस्या )

Maruti Swift Dzire LXI - Cars24 वेबसाईटवर दुसरी सेडान कार स्विफ्ट लिस्टेड आहे. ही कार 2008 चं मॉडेल आहे. याची किंमत 1 लाख 49 हजार 399 रुपये आहे. मारुतीची ही कार आतापर्यंत एकूण 1,43,363 किमीपर्यंत चालली आहे. ही कार खरेदी करणारा व्यक्ती कारचा सेकंड ओनर असेल. Maruti Swift Dzire मध्ये पेट्रोल इंजिन आणि मॅन्युअल ट्रान्समिशन मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात