Home /News /auto-and-tech /

आला Google चा नवा स्मार्टफोन; केवळ इतक्या हजारांत मिळणार Pixel 5A

आला Google चा नवा स्मार्टफोन; केवळ इतक्या हजारांत मिळणार Pixel 5A

जुन्या मिड-रेंज (Mid- Range) Google डिव्हाइसच्या तुलनेत यामध्ये काही नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

    मुंबई 18 ऑगस्ट: बाजारात दररोज म्हटलं तरी नवनवीन स्मार्टफोन लाँच (Smartphone Launch) होत असतात. विविध कंपन्या एकाहून एक सरस फोन लाँच करत ग्राहकांना आकर्षित करतात. ग्राहक सुद्धा आजकाल स्मार्टफोनसाठी मोठी किंमत मोजताना कसलाही विचार करत नाहीत. एखाद्या स्मार्टफोनचे फीचर्स (Features) आवडले की, मग तो स्मार्टफोन खरेदी करतातच. असाच एक स्मार्टफोन गुगलने (Google) नुकताच लाँच केला आहे. गुगल कंपनीने आजवर फारच कमी स्मार्टफोन लाँच केले आहेत. मात्र त्यांचे स्मार्टफोन परफॉर्मन्सच्या बाबतीत चांगले असतात. Google ने आपला नवीन Pixel 5a हा स्मार्टफोन काही निवडक मार्केटमध्ये (Market) लाँच केला आहे. Google चा हा 5G स्मार्टफोन आहे. Google ने स्पष्ट केलं आहे की, Pixel 5a हा फोन 26 ऑगस्टपासून अमेरिका आणि जपानमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. जुन्या मिड-रेंज (Mid- Range) Google डिव्हाइसच्या तुलनेत यामध्ये काही नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये IP67 रेटिंग दिलं आहे. हा स्मार्टफोन वॉटर रेझिस्टंट (Water Resistant) आहे. या स्मार्टफोनला 6.34 इंचाचा डिस्प्ले (Display) आहे. Google Pixel 4a पेक्षा या फोनचा डिस्प्ले थोडा मोठा आहे. Google Pixel 4a चा डिस्प्ले 6.2 इंचाचा होता. Google Pixel 5a चा 60Hz रिफ्रेश रेट (Refresh Rate) आहे. तसंच या फोनला 4680 mAh ची बॅटरी (Battery) देण्यात आली आहे. या फोनमध्ये सर्व नवीन एक्स्ट्रीम बॅटरी सेव्हर मोड (Extreme Battery Saver Mode) उपलब्ध आहे. Internet म्हणजे आहे तरी काय? जाणून घ्या हे नेमकं कसं काम करतं Google Pixel 5a स्मार्टफोनला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर आणि 6GB ची रॅम (RAM) आहे. यामध्ये 128GB स्टोरेज आहे. या फोनच्या कॅमेरामध्ये 12.2 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर (Primary Sensor) आणि 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड असलेला दुसरा सेन्सर आहे. तसंच या फोनला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा (Front Camera) देखील आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सर (Physical Fingerprint Sensor) दिलेला आहे. Google Pixel 5a हा फोन अँड्रॉइड 11 (Android 11) या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. यामध्ये तीन वर्षांपर्यंतचे सॉफ्टवेअर अपडेट (Software Update) सुद्धा दिले आहेत. यामध्ये Google ने टायटन एम सिक्युरिटी मॉड्यूलचा (Titan M Security Module) समावेश केलेला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय (Wifi) 802.11a/b/g/n/ac, GPS, GLONASS, ब्लूटूथ 5.0 आणि NFC सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हा फोन ब्लॅक कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. निम्म्या किमतीत मिळतेय Royal Enfield, Honda CBR, Bajaj Avenger; बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी अमेरिकेत या फोनची किंमत 449 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये किंमत सुमारे 33,000 रुपये आहे. Google चा Pixel 4a ची सुद्धा लाँच होताना त्याची किंमतही 31,999 रुपये होती. सध्या मार्केटमध्ये या किंमतीमध्ये उपलब्ध असणाऱ्या स्मार्टफोनच्या तुलनेत या स्मार्टफोनचे फीचर्स चांगले आहेत. त्यामुळे येत्या काळात हा स्मार्टफोन मार्केटमध्ये नक्कीच धुमाकूळ घालू शकतो.
    First published:

    Tags: Google, Smartphones, Techonology

    पुढील बातम्या