• Home
  • »
  • News
  • »
  • auto-and-tech
  • »
  • निम्म्या किमतीत मिळतेय Royal Enfield, Honda CBR, Bajaj Avenger; बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

निम्म्या किमतीत मिळतेय Royal Enfield, Honda CBR, Bajaj Avenger; बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

लाखोंची बाईक निम्म्या किमतीत

लाखोंची बाईक निम्म्या किमतीत

तुम्ही बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल, तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : कोरोना महासाथीनंतर (Covid-19 Pandemic) पुन्हा एकदा वाहन क्षेत्रामध्ये (Auto Sector) तेजी पाहायला मिळते आहे. सध्या बहुतेक नागरिक सुरक्षित प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीचा (Public Transport) वापर करणं टाळत आहेत. कारण कोरोनाचा संसर्ग अजून पूर्णतः थांबलेला नाही. नागरिकांना गर्दीमध्ये जाणं धोक्याचं वाटत आहे. यामुळे दुचाकी (Two Wheeler) आणि चारचाकी (Four Wheeler) वाहनांच्या विक्रीमध्ये गेल्या महिन्यात 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. असं असलं तरीही देशात अजूनही बरेच नागरिक असे आहेत, की आर्थिक परिस्थितीमुळे ते त्यांच्या आवडीचं वाहन खरेदी करू शकत नाहीत. म्हणूनच आम्ही अशा लोकांसाठी खास माहिती घेऊन आलो आहोत. तुमच्या आवडीच्या टू-व्हीलर्स (Bike) तुम्हाला निम्म्याहून कमी किमतीत सहज मिळू शकतील, यासाठीची माहिती येथे देत आहोत. निम्म्या किमतीत उपलब्ध असलेल्या बाइक्सबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. Royal Enfield Classic 500 cc : रॉयल एनफिल्डच्या या बाइकची एक्स-शोरूम किंमत 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे; मात्र तुम्ही ही बाइक फक्त एक लाख 10 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला ड्रूम (Droom) या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटवर या बाइकशी संबंधित सर्व माहिती दिलेली आहे. हे 2015 सालचं मॉडेल आहे. तसंच या बाइकचं रनिंग फक्त 17 हजार 550 किलोमीटर्स (KM) एवढंच झालं आहे. हे वाचा - OLA e-scooter: या 4 चार राज्यात स्वस्तात मिळणार स्कूटर, पाहा किती कमी होईल किंमत Honda CBR 250R : Droom वेबसाइटवर होंडा सीबीआर 250 आर ही बाइकसुद्धा उपलब्ध आहे. या बाइकची किंमत 80 हजार रुपये आहे. ही बाइक फक्त 39 हजार किलोमीटर्स चालली आहे. तसंच तुम्हाला या बाइकवर EMI चा पर्यायदेखील उपलब्ध आहे. Bajaj Avenger 220cc : Droom या वेबसाइटवर तुम्हाला बजाजची अॅव्हेंजर (Avenger) ही बाइकदेखील मिळेल. या बाइकची किंमत 80 हजार रुपये आहे. ही बाइक 2018 च्या मॉडेलची असून, ती फक्त 20 हजार किलोमीटर चालली आहे. या बाइकवर तुम्हाला EMIचा पर्यायदेखील मिळेल. हे वाचा - OLA ची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात; अवघ्या 499 करु शकता बूक, वाचा फिचर्स तुम्ही बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल, तर Droom या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या सुस्थितीतल्या सेकंड हँड बाइक्समधून आपल्या आवडत्या बाइकची निवड करू शकता. सध्या बाइकच्या किंमती वाढलेल्या असताना स्वस्तात बाइक खरेदी करण्याची नामी संधी यामुळे उपलब्ध झाली आहे.
First published: